Thyroid Meaning in Marathi - मराठीत स्पष्टीकरण आणि समज
Medically Reviewed By
Dr. Ragiinii Sharma
Written By Kirti Saxena
on Nov 28, 2023
Last Edit Made By Kirti Saxena
on Jan 10, 2025
लहान मुलांमध्ये (infants) लक्षणे - थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय?
थायरॉईड ग्रंथी हा फुलपाखराच्या आकाराचा एक लहान अवयव / ऑर्गन आहे जो मानेच्या पुढील भागात, श्वासनलिका भोवती असतो. हा तुमच्या एंडोक्राइन सिस्टमचा एक भाग आहे. (एंडोक्राइन सिस्टम ही अनेक ग्रंथींचे समूह आहे जे हार्मोन तयार करतात आणि स्रावित करतात. थायरॉईड होर्मेन बनवणे, सोडणे आणि नियंत्रित करणे हे थायरॉईडचे मुख्य काम आहे.
थायरॉईड ग्रंथी कोणते हार्मोन बनवते ?
थायरॉईड ग्रंथी थायरॉईड हार्मोन तयार करते. थायरॉक्सिन किंवा T4 जो एक निष्क्रिय प्रोहोर्मोन आहे आणि ट्राईआयोडोथायरोनिन किंवा T3 जो अत्यंत सक्रिय हार्मोन आहे. थायरॉक्सिन आणि ट्राईआयोडोथायरोनिन यांना एकत्रितपणे थायरॉईड हार्मोन म्हणतात.
थायरॉईड हार्मोनचे मुख्य काम चयापचय (metabolism) नियंत्रित करणे आहे. चयापचय ही एक प्रक्रिया आहे जिथे आपल्या शरीरातील अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर होते. ही ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराद्वारे योग्यरित्या कार्य करण्यासाठी वापरली जाते जसे की श्वास घेणे, मेंदूचा विकास, पचन, हृदयाची गती, शरीराचे तापमान राखणे, इत्यादी.
हे सर्व पिट्यूटरी ग्रंथी नावाच्या मास्टर ग्रंथीद्वारे सुपरवाईज केले जाते. ते तुमच्या मेंदूच्या खाली, कवटीच्या मध्यभागी स्थित आहे. पिट्यूटरी ग्रंथी सर्व एंडोक्राइन ग्रंथींच्या हार्मोनचे निरीक्षण आणि नियंत्रण करते. म्हणून त्याला मास्टर ग्रंथी म्हणतात. जेव्हा पिट्यूटरी ग्रंथीला थायरॉईड हार्मोनची कमतरता किंवा भरपूर प्रमाण जाणवते तेव्हा ती स्वतःचे हार्मोन पाठवते ज्याला Thyroid stimulating hormone (TSH) म्हणतात. टीएसएच थायरॉईड ग्रंथीला याबद्दल सांगतो.
थायरॉईड रोग म्हणजे काय?
जेव्हा थायरॉईड ग्रंथी आवश्यक प्रमाणात थायरॉईड हार्मोन तयार करत नाही तेव्हा त्यामुळे थायरॉईड रोग होतो. जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त थायरॉईड हार्मोन बनवते तेव्हा त्याला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. आणि जेव्हा थायरॉईड खूप कमी थायरॉईड हार्मोन बनवते. याला हायपोथायरॉडीझम म्हणतात.
हायपरथायरॉईडीझमची लक्षणे -
अशी स्थिती जेव्हा थायरॉईड ग्रंथी रक्तप्रवाहात खूप जास्त हार्मोन सोडते. त्याला ओव्हरएक्टिव्ह थायरॉईड असेही म्हणतात. हे शरीरातील चयापचय वाढवते.
- तुम्ही प्रयत्न न करता वजन कमी होते.
- तीव्र हृदयाचा ठोका (tachycardia)
- अनियमित हृदयाचा ठोका (arrhythmia).
- खूप भूक लागणे.
- अस्वस्थता आणि चिंता (anxiety)
- हात आणि बोटांमध्ये थरथर.
- घाम येणे.
- उष्णता वाढणे.
- वाढलेली थायरॉईड ग्रंथी ज्याला गोइटर म्हणतात.
- थकवा आणि अशक्त स्नायू.
- त्वचा पातळ होणे.
- बारीक आणि ठिसूळ केस.
- झोपायला त्रास होतो.
- अनियमित मासिक पाळी.
- डोळ्यांची जळजळ होणे.
मुलांमध्ये हायपरथायरॉईडीझम क्वचितच होतो.
हायपोथायरॉईडीझमची लक्षणे -
जेव्हा थायरॉईड ग्रंथी पुरेशी हार्मोन्स तयार करत नाही तेव्हा असे होते. त्याला अंडरएक्टिव्ह थायरॉईड असेही म्हणतात.
- थकवा जाणवणे.
- वजन वाढणे.
- वारंवार आणि जड मासिक पाळी येणे.
- मंद हृदय गती (bradycardia).
- थंडी वाजणे.
- बद्धकोष्ठता (constipation).
- कोरडी त्वचा आणि फुगलेला चेहरा.
- कर्कश आवाज.
- स्नायू कमजोरी, दुखणे आणि कडकपणा.
- केस पातळ होणे.
- नैराश्य (depression) आणि स्मरणशक्ती समस्या.
मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लक्षणे -
- खराब वाढ ज्यामुळे उंची लहान होते.
- परमनेंट दात विकसित होण्यास विलंब होतो.
- प्युबर्टी उशिरा येते.
- खराब मानसिक विकास.
- वजन न वाढणे.
- वाढ व्यवस्थित होत नाही.
- त्वचा आणि डोळे पिवळे होणे, या स्थितीला कावीळ (jaundice) म्हणतात.
- बद्धकोष्ठता.
- कोरडी त्वचा होते.
- कर्कश रडणे.
- वाढलेली जीभ.
- हर्निया.
थायरॉईड रक्त तपासणी कशी करावी ?
जर तुम्हाला वरीलपैकी काही लक्षणे असतील तर तुम्ही थायरॉईड टेस्ट करणे आवश्यक आहे. थायरॉईड रक्त तपासणी दरम्यान, एक लॅब प्रोफेशनल तुमच्या हाताच्या रक्तवाहिनीतून स्वच्छ सुईच्या मदतीने तुमच्या रक्ताचा नमुना घेईल आणि टेस्टट्यूब मध्ये गोळा करेल. नंतर ते तपासणीसाठी लॅबला पाठवले जाते.
हायपोथायरॉईडीझमची कारणे -
- आयोडीनची कमतरता: थायरॉईडद्वारे हार्मोन्स तयार करण्यासाठी आयोडीनचा वापर केला जातो.
- Hashimoto's thyroiditis – एक ऑटॉइम्मुन रोग जेथे शरीराच्या पेशी थायरॉईडवर हल्ला करतात आणि नुकसान करतात.
- थायरॉइडाइटिस: जेव्हा थायरॉईड ग्रंथी सुजतात. थायरॉइडायटिसमुळे तुमची थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊ शकते.
- थायरॉईड ग्रंथी कार्य करत नाही: काहीवेळा, थायरॉईड ग्रंथी जन्मापासून योग्यरित्या कार्य करत नाही.
- मानेच्या भागात रेडिएशन थेरपी: कॅन्सरचा उपचार करताना मानेवरील रेडिएशन थायरॉईड ग्रंथीला नुकसान पोहोचवू शकते.
- रेडिएशनमुळे थायरॉईडमधील पेशींचे नुकसान होते.
- पिट्यूटरी ग्रंथीचे नुकसान – पिट्यूटरी ग्रंथीची समस्या थायरॉईड TSH निर्मितीमध्ये अडथळा आणू शकते. थायरॉईड आणि पिट्यूटरी ग्रंथीबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही TSH टेस्ट घेऊ शकता.
हायपरथायरॉईडीझमची कारणे -
- ग्रेव्हस रोग / Graves' disease : थायरॉईड ग्रंथी अति ॲक्टिव होते आणि खूप जास्त हार्मोन तयार करते.
- नोड्यूल: नोड्यूल हे थायरॉईड ग्रंथीतील टिश्यूचे गुठळ्या आहेत जे अति ॲक्टिव होऊ शकतात, ज्यामुळे खूप जास्त थायरॉईड हार्मोन तयार होतात.
- थायरॉइडायटीस: ही एक तात्पुरती इम्युन सिस्टम समस्या आहे ज्यामुळे तुमचा थायरॉईड फुगतो आणि तुमच्या रक्तप्रवाहात हार्मोन्स वाढतात.
- जास्त आयोडीन: जेव्हा तुमच्या शरीरात आयोडीनचे प्रमाण जास्त असते जे थायरॉईडला जास्त थायरॉईड हार्मोन तयार करण्यास मदत करते.
- मधुमेह: टाइप 1 मधुमेह हा ऑटोइम्युन विकार आहे. जर तुम्हाला हे असेल तर तुम्हाला हायपरथायरॉईडीझमची उच्च शक्यता आहे. टाईप 2 मधुमेह असेल तर शक्यता कमी असते किंवा नंतर होऊ शकतो.
तुमच्या रक्तप्रवाहातील थायरॉईड होर्मोंची पातळी जाणून घेण्यासाठी या काही टेस्ट आहेत-
थायरॉईड कसे नियंत्रित करावे
- व्हिटॅमिन ए जास्त असलेल्या अन्न उत्पादनांचे सेवन करा. सर्वात सामान्य व्हिटॅमिन ए समृद्ध पदार्थ आहेत; पिवळ्या आणि हिरव्या भाज्या, गाजर, अंडी, जर्दाळू, पालक, गाजर इत्यादी.
- तुमच्या अन्नामध्ये प्रोबायोटिक्सचा समावेश करा.
- अन्न हळूहळू खा.
- योगामुळे एंडोक्राइन सिस्टम योग्यरित्या कार्य करण्यास मदत होईल.
- धूम्रपान आणि मद्यपान थायरॉईड ग्रंथींसाठी खूप हानिकारक आहे.
- हेल्थी फॅटचे सेवन थायरॉईड ग्रंथीच्या आणि शरीराच्या संपूर्ण एंडोक्राइन सिस्टमचे योग्य कार्य करण्यास मदत करते
- प्रक्रिया केलेले आणि जंक फूड टाळा.