898 898 8787

Hemoglobin Meaning in Marathi: रक्तातील अनिवार्य घटक

Health

Hemoglobin Meaning in Marathi: रक्तातील अनिवार्य घटक

author

Medically Reviewed By
Dr. Ragiinii Sharma

Written By Meenakshi
on Mar 28, 2024

Last Edit Made By Meenakshi
on Mar 28, 2024

share
Hemoglobin
share

हिमोग्लोबिन (Hb) हे लाल रक्त पेशी मध्ये असणारे प्रोटिन आहे. हे एक रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य म्हणजे पूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवणे. ऑक्सिहेमोग्लोबिन म्हणून ते फुफ्फुसातून शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन पोहोचवते. काही प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड देखील हिमोग्लोबिनद्वारे कार्बामिनोहेमोग्लोबिनच्या रूपात टिशू मधून परत फुफ्फुसात पाठवले जाते. रक्त आणि शरीरात पुरेसा ऑक्सिजन मिळावा योग्य Hb पातळी राखणे महत्वाचे आहे.

रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिन मुळे असतो. हिमोग्लोबिनचे मानक संक्षेप (standard abb.) "Hb" आहे. हे तुम्ही तुमच्या जवळजवळ प्रत्येक रक्त तपासणी रीपोर्ट मध्ये पाहू शकता.

प्रत्येक व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वेगवेगळे असते. पुरुषांमध्ये सामान्यतः स्त्रियांपेक्षा उच्च पातळी असते. संपूर्ण रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्रॅम प्रति डेसीलिटर (g/dl) मध्ये व्यक्त केले जाते.

सामान्य Hb पातळी

  • पुरुषांसाठी 14 ते 18 g/dl आहे.
  • महिलांसाठी 12 ते 16 g/dl आहे.

जेव्हा हिमोग्लोबिनची पातळी कमी होते तेव्हा ॲनिमिया होतो.

जेव्हा रक्तामध्ये RBC जास्त प्रमाणात असतात तेव्हा त्याला एरिथ्रोसाइटोसिस म्हणतात, यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते.

हिमोग्लोबिनची रचना

हिमोग्लोबिनची मॉलीक्युलर रचना 1959 मध्ये मॅक्स पेरुट्झ यांनी दिली होती. हे टेट्रामेरिक प्रोटीन आहे. अडल्ट्स मध्ये हिमोग्लोबिनचा मुख्य प्रकार 'अल्फा' आणि 'बीटा' पॉलीपेप्टाइड साखळ्यांपैकी प्रत्येकी दोन सब युनिट्स नि बनलेला असतो. प्रत्येक पाली पेप्टाइड साखळी हेम प्रोस्थेटिक गटाशी जोडलेली असते.

  • अल्फा सब युनिट - हे अल्फा पाली पेप्टाइड साखळीचे बनलेले आहे ज्यामध्ये 141 अमीनो ऍसिड अवशेष आहेत.
  • बीटा सबयुनिट - हे 146 एमिनो ॲसिड अवशेष असलेल्या बीटा पाली पेप्टाइड साखळी पासून बनलेले आहे.
  • हेम ग्रुप - हा एक लोहयुक्त कृत्रिम गट आहे, जो प्रत्येक पाली पेप्टाइड साखळीला जोडलेला असतो. त्यात पोर्फिरिन रिंगच्या मध्यभागी आयर्न असते.

हिमोग्लोबिनचे फंक्शन

Hb चे मुख्य कार्य म्हणजे विविध टिश्यू मध्ये ऑक्सिजन कॅरि करणे आणि वाहून नेणे. हिमोग्लोबिन मध्ये लोह महंजे आयर्न असते. हे लोह एचबीला आपण श्वास घेत असलेल्या हवेतून ऑक्सिजन उचलू देतो जिथून ते शरीराच्या सर्व अवयवांमध्ये पोहोचवले जाते.

लो हिमोग्लोबिन लेवल

  • कमी हिमोग्लोबिन पातळी सहसा सूचित करते की एखाद्या व्यक्तीला अनेमिया आहे.
  • ॲनिमियाच्या सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
  • छाती दुखणे
  • थंड हात आणि पाय
  • नेहमीपेक्षा फिकट गुलाबी त्वचा
  • थकवा
  • डोकेदुखी
  • अनियमित हृदयाचा ठोका
  • धाप लागणे
  • चक्कर येणे
  • कमजोरी.

हाय हिमोग्लोबिन लेवल

उच्च हिमोग्लोबिन पातळीमुळे पॉलीसिथेमिया नावाचा एक rare रक्त विकार होतो. पॉलिसी थेमियामध्ये, शरीर खूप जास्त लाल रक्तपेशी बनवते. त्यामुळे रक्त नेहमीपेक्षा घट्ट होते. यामुळे गुठळ्या, हृदयविकाराचा झटका आणि stroke होऊ शकतो. ही एक गंभीर आजीवन स्थिती आहे जी उपचाराशिवाय प्राणघातक ठरू शकते.

उच्च हिमोग्लोबिनच्या काही लक्षणे समाविष्ट असू शकते:

  • चक्कर येणे.
  • सांधे सूज
  • लवकर जखम होणे किंवा ब्लीडिंग .
  • जास्त घाम येणे (हायपरहाइड्रोसिस).
  • अस्पष्ट वजन कमी होणे.
  • थकवा.
  • डोकेदुखी.

पिवळसर डोळे किंवा त्वचा (कावीळ)

हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याचे कारण काय?

कमी हिमोग्लोबिन पातळी खूप कॉमन आहे. त्यामागे अनेक घटक आहेत.

तुमचे शरीर तुमच्या बोन मॅरो मध्ये लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी तयार करते. काहीवेळा, परिस्थिती आणि रोगा मुळे तुमचा बोने मॅरो पुरेशा लाल रक्तपेशींचे उत्पादन करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. म्हणून, तुमचे शरीर पुरेशा लाल रक्तपेशी तयार करत नाही, याचा अर्थ हिमोग्लोबिन देखील कमी आहे.

अनेक वेळा शरीराने पुरेशा लाल रक्तपेशी निर्माण केल्या तरीही, ते कदाचित मृत rbc जलद बदलू शकत नाही किंवा शरीराद्वारे तयार केल्या जात असलेल्या rbc पेक्षा जास्त rbc वापरले जाते.

कमी हिमोग्लोबिनचे आणखी एक कारण म्हणजे ब्लीडींग. दुखापतीमुळे तुमचे खूप रक्त कमी होते, ते बाह्य किंवा अंतर्गत असू शकते जसे की अल्सर किंवा कोणताही आजार. अनेक स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्यास अनेमियाचा सामना करावा लागतो.

जेव्हा शरीर लोह शोषू शकत नाही, तेव्हा ते लाल रक्तपेशी विकसित करण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम करते.

तुम्ही कदाचित संतुलित आहार घेत नसाल. जर तुमच्या आहारात लोह, जीवनसत्त्वे B12 आणि B9 कमी असतील तर तुम्हाला कमी हिमोग्लोबिनचा त्रास होईल.

हिमोग्लोबिन (Hgb) ब्लड टेस्ट

हिमोग्लोबिन (Hgb) ब्लड टेस्ट ही डॉक्टरांनी सुचवलेली सर्वात सामान्य टेस्ट आहे. हिमोग्लोबिनची पातळी सामान्यतः थकवा साठी जबाबदार असते. ही चाचणी तुमच्या लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिन चे प्रमाण मोजण्यात मदत करते. ही चाचणी करण्यासाठी, एक लॅब अटेंडंट तुमच्या नसांमधून रक्ताचा sample घेईल, सामान्यतः तुमच्या हाताच्या वरच्या बाजूस किंवा तुमच्या हाताच्या मागच्या भागातून. तो अल्कोहोल-आधारित वाइपने तुमची त्वचा डिसइनफेक्ट करेल. नमुना विश्लेषणासाठी लॅबला पाठविला जातो आणि तुम्हाला तुमचे परिणाम काही तासांत किंवा दिवसात मिळतील.

तुमचे एकंदर आरोग्य तपासणीसाठी: रक्ताची संपूर्ण गणना (CBC) हा नियमित मेडिकल तपासणीचा एक सामान्य भाग आहे. हे तुमचे हिमोग्लोबिन आणि इतर रक्त घटकांचे स्तर मोजते. तुम्हाला काही समस्या आहे की नाही हे कोणतेही बदल किंवा असामान्य पातळी सांगू शकतात.

विकारांची तपासणी करणे: अस्वस्थता, थकवा यांसारखी लक्षणे हीमोग्लोबिन कमी करणारी स्थिती दर्शवू शकतात, जसे की संसर्ग किंवा इंटर्नल ब्लीडिंग.

तुमच्या स्थितीचे निरीक्षण करायला: अनेक आरोग्य समस्यांमुळे हिमोग्लोबिनच्या पातळीत बदल होतात. जर तुमची आरोग्य स्थिती कमी हिमोग्लोबिनचे कारण असेल तर तुमचे डॉक्टर तुमची पातळी नियमितपणे तपासू शकतात.

हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करणारे पदार्थ.

लोहयुक्त पदार्थ: जसे हिरव्या पालेभाज्या, टोफू, पालक, अंडी, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि बीन्स, मांस, मासे, सुका मेवा.

व्हिटॅमिन-सी समृद्ध अन्न: लोह पूर्णपणे शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. म्हणूनच संत्री, लिंबू, भोपळी, मिरची, टोमॅटो, द्राक्षे, बेरी जास्त प्रमाणात खा, कारण त्यात व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते.

फॉलिक ऍसिड: फॉलिक ऍसिड हे बी-कॉम्प्लेक्स विटामिन आहे जे शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असते. हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स, वाळलेल्या बीन्स, शेंगदाणे, केळी, ब्रोकोली यांचे अधिक सेवन करा.

डाळिंब: डाळिंब हे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर सह कॅल्शियम आणि लोह या दोन्हींचा समृद्ध स्रोत आहे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण नक्कीच वाढेल.

खजूर: खजूर मध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. उच्च साखरेमुळे मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त खाणे टाळावे.

बीटरूट: हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. यामध्ये आयर्न, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.

लेगुम्स: मसूर, शेंगदाणे, मटार आणि बीन्स देखील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करू शकतात. त्यांच्यातील लोह आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढविण्यास मदत करते.

टरबूज: टरबूज हे सर्वोत्तम फळांपैकी एक आहे ज्यात लोह आणि व्हिटॅमिन-सी भरपूर आहे जेणे करून हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog