ओटीपोट दुखणे - कारणे आणि काळजी घेण्याचे उपाय

Medically Reviewed By
Dr. Mayanka Lodha Seth
Written By Anjali Dubey
on Jul 10, 2025
Last Edit Made By Anjali Dubey
on Jul 10, 2025

छाती आणि जांघेच्या (groin) मधला शरीराचा भाग, याला इंग्रजीमध्ये अॅबडोमेन असे म्हणतात. शरीरातील हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण यात अनेक जीवनावश्यक ऑर्गन्स असतात. हे ऑर्गन्स पचन, प्रजनन आणि शरीराच्या इतर कार्यांसाठी आवश्यक असतात. शरीरशास्त्रानुसार, अॅबडोमेनला चार मुख्य भागांमध्ये विभागले जाते: राईट अप्पर, लेफ्ट अप्पर, राईट लोअर आणि लेफ्ट लोअर. अचूक निदानासाठी काही वेळा याला नऊ लहान भागांतही विभागले जाते.
ओटीपोटात कोणते अवयव असतात?
बहुतेक ऑर्गन्स पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही सारखेच असतात. फक्त खालच्या ओटीपोटात फरक असतो.
दोघांमध्ये सामान्य:
- अपेंडिक्स
- ग्रोइन / इंग्विनल (जिथे हर्निया होऊ शकतो)
- पोट
- लहान आतडे (जेजुनम आणि इलियम)
- मोठे आतडे (कोलन)
- यकृत (लिव्हर)
- प्लीहा (स्प्लीन)
- पित्ताशय (गॉल ब्लॅडर)
- स्वादुपिंड (पॅन्क्रियाज)
- मूत्रपिंड (किडण्या)
- मूत्राशय (ब्लॅडर)
- मूत्रमार्ग (युरेटर्स)
स्त्रियांमध्ये:
- गर्भाशय (युटेरस)
- फॅलोपियन ट्यूब्स
- अंडाशय (ओव्हरीज)
पुरुषांमध्ये
- प्रोस्टेट ग्रंथी (Prostate gland)
- वीर्यवाहिनी (Vas deferens)
ओटीपोटातील वेदनांची कारणे
पोटात अनेक अवयव असतात. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला नक्कीच वेदना देईल. वेदना समस्येच्या प्रकारावर अवलंबून असतात. कधीकधी ती स्वतःहून निघून जाते, कधीकधी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.
-
पचनाशी संबंधित कारणे
ही कारणे खूप सामान्य आहेत आणि शरीराच्या अन्न पचवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असतात.
अपचन- जडपणा, जळजळ, अन्न पचायला त्रास. जास्त खाल्ल्यावर, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यावर हे सहसा होतं.
गॅस आणि पोट फुगणे- काही पदार्थ पचताना आतड्यांमधील बॅक्टेरियामुळे गॅस तयार होतो. गॅसमुळे वेदना होतात.
कब्ज / बद्धकोष्ठता- जेव्हा तुमचे पोट साफ नसते किंवा तुम्हाला शौचास जाण्यास त्रास होतो तेव्हा ओटीपोटात खूप वेदना होतात.
अतिसार (Diarrhea)- हे सहसा संसर्ग (इन्फेक्शन), फूड पॉयझनिंग किंवा विशिष्ट पदार्थांची ऍलर्जी (food intolerance) यामुळे होतं.
-
संसर्ग किंवा सूज
व्हायरल इंफेक्शन- स्टमक फ्लूमुळे मळमळ, उलटी, अतिसार आणि ओटीपोटात पेटके येतात.
अपेंडिसाइटिस- ही एक गंभीर स्थिती आहे जिथे अपेंडिक्स मध्ये सूज येते. यावर त्वरित उपचार आवश्यक असतात.
पित्ताशयाचे दगड- पोटाच्या वरच्या उजव्या भागात तीव्र वेदना.
पॅन्क्रियाटायटिस- पोटामागे असलेल्या पॅन्क्रियाज या अवयवाला सूज येणे. यामुळे वरच्या ओटीपोटात खूप तीव्र वेदना होतात, ज्या पाठीकडे पसरतात.
हेपॅटायटिस- लिव्हरला सूज येणे. हे विषाणू, अल्कोहोल किंवा इतर कारणांमुळे होऊ शकते.
डायव्हर्टिक्युलायटिस- मोठ्या आतड्यामध्ये तयार होणाऱ्या छोट्या पिशव्यांना (डायव्हर्टिक्युला) सूज येणे किंवा संसर्ग होणे.
-
स्त्रियांसंबंधित कारणं (रीप्रोडक्टिव्ह सिस्टीम)
मासिक पाळी- मासिक पाळीच्या आधी किंवा दरम्यान खालच्या ओटीपोटात होणारा वेदना सामान्य आहे. हे गर्भाशयाच्या आकुंचनामुळे होते. जर वेदना असह्य असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ओव्हेरियन सिस्ट किंवा फायब्रॉइड्स- ओव्हेरियन सिस्ट म्हणजे अंडाशयांवरील द्रवाने भरलेल्या पिशव्या असतात आणि फायब्रॉइड्स हे गर्भाशयात होणारे कर्करोग नसलेले ट्यूमर असतात.
पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (PID)- महिलांच्या रीप्रोडक्टिव्ह अवयवांमध्ये (गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब्स, अंडाशय) होणारा संसर्ग.
एक्टोपिक प्रेग्नन्सी- जेव्हा फलित अंडी गर्भाशयाऐवजी फॅलोपियन ट्यूबमध्ये रोपण होते तेव्हा असे होते. यामुळे एका बाजूला खालच्या ओटीपोटात तीव्र, तीक्ष्ण वेदना होतात आणि योनीतून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. ही एक मेडिकल एमर्जन्सि आहे.
-
मूत्रमार्गाशी संबंधित कारणे
मूत्रमार्गाचा संसर्ग (Urinary Tract Infection - UTI)- हा मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात होणारा संसर्ग आहे. त्यामुळे खालच्या ओटीपोटात अस्वस्थता किंवा वेदना होतात, लघवी करताना जळजळ होते आणि वारंवार लघवी करण्याची इच्छा होते.
मूत्रपिंडातील खडा / मुतखडा- जेव्हा आपल्या मूत्रात काही विशिष्ट पदार्थांचे प्रमाण खूप वाढते आणि ते पूर्णपणे विरघळण्यासाठी पुरेसं पाणी नसतं, तेव्हा त्या पदार्थांचे स्टोन तयार होतात. या मुतखड्यांमुळे बाजूला किंवा पाठीत खूप तीव्र आणि तीक्ष्ण वेदना होतात.
-
पुरुष जनन प्रणाली
प्रोस्टेट इन्फ्लेमेशन (prostatitis) – ही प्रोस्टेट ग्रंथीची जळजळ आहे, जी बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे किंवा इतर कारणांमुळे होऊ शकते. यामुळे वेदना, लघवीच्या समस्या आणि इतर लक्षणे उद्भवू शकतात.
-
इतर कारणे
पोटाच्या स्नायूंना ताण- जड वस्तू उचलणे किंवा तीव्र व्यायाम यामुळे पोटाचे स्नायू ताणले जाऊ शकतात किंवा जखमी होऊ शकतात.
हर्निया- जेव्हा शरीराचा एखादा अंतर्गत अवयव (सहसा आतड्याचा काही भाग) ओटीपोटाच्या भिंतीतील कमकुवत भागातून बाहेर ढकलला जातो आणि एक गाठ तयार होते, तेव्हा त्याला हर्निया म्हणतात. विशेषतः ताण दिल्यावर किंवा काही उचलल्यावर या गाठीमुळे वेदना होऊ शकतात.
कॅन्सर किंवा ट्युमर- पोटदुखी किंवा पोटात वारंवार होणारी अस्वस्थता, विशेषतः नाभीच्या वरच्या भागात जाणवणारी, ही पोटाच्या कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकते. यासोबतच काही इतर कॅन्सर देखील आहेत – जसं की कोलोरेक्टल कॅन्सर (म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर), स्वादुपिंडाचा कॅन्सर (pancreatic cancer), यकृताचा कॅन्सर (liver cancer), गर्भाशयाचा कॅन्सर (uterine cancer) आणि पित्ताशयाचा कॅन्सर (gallbladder cancer) – हे देखील पोटात दुखणं किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतात.
इरिटेबल बॉवेल सिंड्रोम- ही एक सामान्य, दीर्घकालीन स्थिती आहे जी मोठ्या आतड्यावर परिणाम करते. यामुळे पेटके, पोटदुखी, पोटफुगी, गॅस आणि अतिसार किंवा बद्धकोष्ठता येते. शौचक्रियेनंतर वेदना सहसा कमी होतात.
ऑस्टायटिस प्यूबिस- पोश्चरमध्ये अडचण, विशेषतः खेळ खेळणे आणि उठणे.
ओटीपोटदुखीची लक्षणे
पोटदुखी म्हणजे फक्त वेदनाच नाही तर तुम्हाला त्या वेदनांचे कारण देखील समजून घेतले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला योग्य लक्षणे माहित असणे आवश्यक आहे जसे की-
- पोट फुगणं आणि ढेकर येणं.
- अचानक भूक बंद होणं किंवा जेवणाची इच्छा न होणं
- छातीत किंवा पोटाच्या वरच्या भागात जळजळ, अॅसिडिटी.
- मळमळ आणि उलटी होणं.
- अचानक अतिसार किंवा बद्धकोष्ठता. आयबीएस किंवा कोलनशी संबंधित त्रास.
- लघवी करताना जळजळ किंवा वेदना
- सतत ताप येणे आणि पोट दुखणे.
- वजन अचानक कमी होणे.
- मलात रक्त येणं किंवा उलटीत रक्त दिसणं (पोटात अल्सर, कोलन कॅन्सर किंवा आतून रक्तस्राव सुरू झाल्याचे हे संकेत)
डॉक्टरांकडे कधी जायचं?
पोटदुखी ही एक सामान्य गोष्ट आहे. बऱ्याचदा वेदना येतात आणि जातात. पण जर दोन दिवसांनंतरही पोटदुखी कमी झाली नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. अशा वेळी, जर तुम्हाला खालील लक्षणे दिसली, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे:
- अचानक आणि तीव्र वेदना
- जेवण केल्यानंतर त्रास वाढत असेल
- ताप, सतत उलटी, चक्कर किंवा जुलाब
- शौचात किंवा उलटीत रक्त दिसत असेल
- वजन झपाट्याने कमी होत असेल
- श्वास घ्यायला त्रास
- छातीत जडपणा किंवा वेदना.
- लघवी करताना जळजळ आणि प्रचंड वेदना.
डॉक्टर कोणत्या तपासण्या सुचवतात?
एंडोस्कोपी, अल्ट्रासाऊंड सोबत, डॉक्टर काही चाचण्या सुचवू शकतात पण त्या लक्षणांनुसार बदलू शकतात.
निष्कर्ष
तर आता तुम्हाला समजले असेल की, जर सामान्य पोटदुखी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिली, तर ती सामान्य नसते. निरोगी अन्न खाणे, भरपूर पाणी पिणे आणि योग्य व्यायाम केल्याने तुम्हाला अशा आजारांपासून स्वतःचा बचाव करता येतो.जेव्हा तुम्ही तुमचे आरोग्य गांभीर्याने घेत नाही तेव्हा आरोग्याच्या समस्या सुरू होतात. त्यामुळे, स्वतःकडे दुर्लक्ष करणे थांबवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.


