898 898 8787

केएफटी टेस्ट कसे केले जाते? ती कसे कार्य करते? - MyHealth

Lab Test

केएफटी टेस्ट कसे केले जाते? ती कसे कार्य करते?

author

Medically Reviewed By
Dr. Ragiinii Sharma

Written By Komal Daryani
on Jul 4, 2023

Last Edit Made By Komal Daryani
on Mar 18, 2024

share
केएफटी टेस्ट
share

किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या टेस्ट किंवा तपासणीला केएफटी टेस्ट असं म्हणतात. या टेस्ट मध्ये आपले मूत्र किंवा रक्त तपासले जाते. या टेस्ट मुळे क्रिएटीनीन, ब्लड युरिया नायट्रोजन (BUN), ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट (GFR) आणि इलेकट्रोलाईट मोजणे कळू शकतं . नमुन्यामधून पांढरी रक्तकोश, लाल रक्तकोश, प्रोटीन, किडनी विषाणे अशा विविध किडनी विषयक गोष्टींची नोंद घेता येते. 

आपल्या शरीरात किडनीचे महत्व काय आहे ? 

आपल्या पाठीच्या कण्याच्या बाजूला असलेला, राजमाचे २ दाणे सारखा दिसणारा अवयव म्हणजे किडनी. शरीरातील घाण मुत्रा द्वारे बाहेर फेकण्याचे काम किडनी करते. त्याच प्रमाणे अनेक काम  किडनी करते. जसे कि 

किडनी शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार करते. व्हिटॅमिन डी शरीरातील हाडं आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम घटक आहे. 

किडनी मधून तयार होणाऱ्या हार्मोन्स मुळे शरीरातील रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियमित राहतं . 

केएफटी टेस्ट का केली जाते ? 

ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबिटीस आहे, ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर चा त्रास आहे अशा लोकांना किडनी खराब होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे अशा लोकांना केएफटी टेस्ट करण्याचे सुचवले जाते. 

 • लघवी करताना त्रास होणे 
 • सतत लघवीला होणे 
 • लघवीच्या सुरवातीला दुखणे 
 • लघवीतून रक्त जाणे 

वरील लक्षणे आढळून आल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवून केएफटी टेस्ट करण्याचे सुचवले जाते. 

 • अशक्तपणा 
 • भूक न लागणे 
 • लघवीला त्रास होणे 
 • मळमळ होणे 
 • वमन किंवा उलटी होणे 
 • झोपताना अस्वस्थता जाणवणे 
 • त्वचा रुक्ष होणे 
 • त्वचेला खाज सुटणे 
 • स्नायूंमध्ये कळा येणे 
 • पाय सुजणे 
 • पायाचा घोटा सुजणे 
 • छातीत दुखणे 
 • श्वास घेताना त्रास होणे 
 • उच्च रक्तदाब होणे 
 • हालचाल कमी होणे 

वरील लक्षणे आढळल्यास किडनी ला त्रास होण्याचा किंवा किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. असे असल्यास लगेचच  जवळच्या डॉक्टरांना दाखवावे. 

 • मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन 
 • मधुमेह म्हणजेच डायबिटीस 
 • उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर 
 • अनुवंशिक किडनी चा त्रास असणे 

हि लक्षणे सुद्धा किडनी मध्ये त्रास असल्याचे सुचवतात. हि लक्षणे आढळून आल्यास डॉक्टर वरचेवर ब्लड टेस्ट करण्याचे किंवा केएफटी टेस्ट करण्याचे सुचवतात. 

https://redcliffelabs.com/kidney-function-test-kft

केएफटी (किडनी फंक्शन टेस्ट) कशाप्रकारे केली जाते ? 

केएफटी टेस्ट करण्यासाठी आपल्या जवळच्या लॅबोरेटरी मध्ये जावे. तिथे आपल्या  शरीरातून रक्ताचा नमुना घेतला जातो आणि तपासण्यासाठी दिला जातो. या टेस्ट मुळे रक्तातील काही घटकांचे मूल्यमापन करता येते, जसे कि क्रिएटीनीन, ब्लड युरिया नायट्रोजन (BUN), ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट (GFR) आणि इलेकट्रोलाईट मोजणे.  

केएफटी टेस्ट मध्ये युरीन टेस्ट अतिशय महत्वाची आहे. युरीन टेस्ट करण्यासाठी विवीध पद्धतींचा वापर केला जातो. युरीन टेस्ट करण्यासाठी लॅब मधून एक छोटा प्लास्टिक चा डबा दिला जातो, त्या द्वारे मूत्र जमा केले जाते आणि लॅब मध्ये तापसण्यासाठी दिले जाते. युरीन टेस्ट करण्यासाठीच्या विविध पद्धती खालील प्रमाणे 

मॉर्निंग युरीन म्हणजे सकाळी किंवा पहाटे उठल्यावर पहिली युरीन घेणे. 

रँडम युरीन. या पद्धतीने तुम्ही दिवसभरात कधीही आणि आपल्या कोणत्याही युरीन चा नमुना देऊ शकता. 

२४ तास मूत्र साठवून ठेवणे . या पद्धतीनुसार तुम्हाला २४ तासांमध्ये मूत्र साठवून ठेवण्यासाठी एक डबा दिला जातो . या वेळेत मूत्र साठवून  लॅब मध्ये परीक्षणासाठी दिले जाते. 

केएफटी टेस्ट नंतर काय होते ?

केएफटी टेस्ट अतिशय सोप्या पद्धतीने केल्या जातात. त्याने कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही . क्वचितच काही जणांमध्ये थकवा किंवा चक्कर येणे हे परिणाम जाणवतात. 

आपल्या निकालाच्या विश्लेषणाच्या आधारे आपले डॉक्टर आपल्याला तपासणीची सूचना देतील. त्यामुळे आपल्याला आपल्या किडनीच्या आरोग्या बद्दल अधिक सूचना मिळेल. 

जर तपशीलानंतर तुम्हाला तुमच्या डॉक्टरने किंवा वैद्यकीय तंत्रद्यांनी कोणतेही उपचार सांगितले असतील तर ते तुम्हाला सूचित केले जाईल. 

जर आपला रिपोर्ट नॉर्मल असेल किंवा किडनी संबंधी कोणतीही तक्रार  नसेल तर आपल्या किडनी ची कार्यक्षमता सामान्य आहे. 

अनुपात बदल, किडनीची कार्यक्षमता बघण्यासाठी केएफटी टेस्ट मध्ये अनुतापांचे मूल्यमापन केले जाते. जर तुमच्या टेस्ट च्या निकालामुळे अनुतापात कोणताही बदल दिसत असेल, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला त्यावर योग्य उपचार आणि सल्ले देतील. 

किडनी फंक्शन टेस्ट चे मूल्य किती ? 

किडनी फंक्शन टेस्ट किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी तयार केली गेलेली टेस्ट आहे. या टेस्ट द्वारे रक्तातील विविध घटक जाणून घेतले जाऊ शकतात. केएफटी टेस्ट द्वारे मुत्रा मधील प्रथिने तपासली जाऊ शकतात. किडनी फंक्शन टेस्ट चे मूल्य किव्वा त्याची किंमत वेगवेगळ्या देशात आणि वेगवेगळ्या शहरात वेगवेगळी असू शकते. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

 • ब्लड टेस्ट किडनी संबंधी समस्यांची तपासणी करू शकते का? 

होय , ब्लड टेस्ट केल्या मुले किडनी संबंधी समस्यांची तपासणी होऊ शकते. ब्लड टेस्ट मुळे किडनी च्या समस्येची मूल्यमापे आणि अनियमितता यांची माहिती मिळते. क्रिएटिनिन लेवल किडनीच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करते. क्रिएटीनीन लेवल जास्त आढळ्यास किडनी च्या समस्येची संभावना अधिक आहे. क्रिएटीनीन लेवल तपासण्यासाठी ब्लड टेस्ट करणे आवश्यक आहे. 

 • किडनी संबंधी समस्यांची लक्षणे काय काय असू शकतात ? 

किडनी संबंधी समस्या विविध प्रकारच्या आहेत. त्यांची लक्षणे सुद्धा विविध प्रकारची आहेत. किडनी संबंधी समस्यांची लक्षणे पुढील प्रमाणे. 

 • लघवी तपकिरी , लाल रंगाची होणे 
 • लघवी मधून रक्त जाणे 
 • लघवी करताना जळजळ होणे 
 • लघवी करताना दुखणे 
 • रक्तदाब वाढणे 
 • मळमळ होणे 
 • अचानक वजन कमी होणे 
 • धाप लागणे 
 • वारंवार थकवा जाणवणे 
 • पायाचा घोटा सुजणे 
 • पाय सुजणे 
 • हात सुजणे 
 • हृदयावर दाब येणे 
 • अनियमित मूत्र होणे 
 • मूत्र न होणे 
 • नियमित ऍसिडिटी होणे 

किडनी हा शरीरातील दूषित घटके मुत्रा द्वारे शरीरा बाहेर फेकण्यासाठी अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी च्या समस्या निर्माण झाल्यास किंवा किडनी ने काम करणे बंद केल्यास दूषित घटके शरीराबाहेर फेकली जाऊ शकणार नाही. दूषित घटके बाहेर फेकले ना गेल्यास शरीरातील इतर अवयवांवर त्याचा वाईट परिणाम होतो आणि शरीराचे कार्य मंदावतं. 

त्या मुळे वरील कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधने आणि त्या नुसार केएफटी टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. केएफटी टेस्ट च्या रिझल्ट मधून आपल्या डॉक्टरांना आपल्या किडनी मधल्या समस्यांची अधिक चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल आणि त्या समस्यांवर उपाय सांगणे डॉक्टरांसाठी सोपे होईल आणि आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. रेडक्लीफ लॅब आपल्या रक्ताचा आणि मूत्राचा रिपोर्ट त्याच दिवशी देते. रेडक्लीफ लॅब आपल्या मूत्राचा आणि रक्ताचा योग्य, स्वच्छ रिपोर्ट देते. रेडक्लीफ लॅब आपल्या घरी येऊन रक्त आणि मूत्र तपासण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देते. अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या रेडक्लीफ लॅब ला संपर्क साधावा.

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog