यकृत हा एक सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे, जो पोटाच्या उजव्या बाजूला असतो. ज्याचे वजन सुमारे १.२ ते १.५ किलो असते. यकृत आतड्यांच्या पिंजऱ्याद्वारे संरक्षित असते. यकृताचे मुख्य काम म्हणजे रक्त शुद्ध करणे, रसायने शुद्ध करणे, पित्तस्राव करणे जे जाड द्रवरूपात चरबी नष्ट करते आणि त्यामुळे पचनास मदत होते. तसेच यकृत साखरेचे प्रमाण राखण्यास मदत करते, इतर द्रवपदार्थांची पातळीही संतुलित करते. प्रथिने तयार करण्यासाठी यकृत हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. यकृताद्वारे पचन, साठवण, प्रथिने संश्लेषण, पित्त उत्पादन यांसारखी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. हे रक्त गोठणेदेखील नियंत्रित करते. यकृतात बिघाड झाल्यास या भूमिका पार पडल्या जात नाहीत, ज्याचा शरीराच्या सामान्य प्रक्रियेवर परिणाम होतो आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमकुवत होते.
Liver Function Test (LFT)
Offer Price:
- Total no.of Tests - 12
- Quick Turn Around Time
- Reporting as per NABL ISO guidelines
यकृताचे आरोग्य तपासण्यासाठी यकृत कार्य चाचणी (LFTs)
Liver functioning tests चाचण्यांचा एक असा संच आहे जो यकृताची स्थिती तपासत असतो. तो यकृतातील एन्झाईम्स, बिलीरुबिन, पित्तस्राव आणि प्रथिने यांच्या प्रमाणाद्वारे निर्धारित केले जातो. यकृतातील कोणताही संसर्ग, बिघाड किंवा रोग याबद्दल तो अगदी स्पष्ट कल्पना देतो. उपचाराची गरज आहे की नाही हेदेखील तो सुनिश्चित करतो. यकृताची स्थिती बिघडू लागली की, हिपॅटायटीस, सिरोसिस, यकृताचा कर्करोग, यकृत निकामी होणे, कावीळ, पित्ताचे खडे यांसारखे रोग जणू रांगेत उभे राहतात. अशा जीवघेण्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपले यकृत नियंत्रणात ठेवणे आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणून liver functioning tests गरजेच्या असतात. तसेच ALT, एस्पार्टेट ट्रान्समिनेज (एएसटी), अल्कधर्मी फॉस्फेट (ALP), अल्ब्युमिन आणि एकूण प्रथिने, बिलीरुबिन, गॅमा-ग्लूटामाइलट्रान्सफेरेस (GGT), एल-लॅक्टेट डिहायड्रोजनेज (एलडी), प्रोथ्रोम्बिन टाईम (PT), यांसारख्या काही यकृत कार्य चाचण्यादेखील महत्त्वाच्या असतात.
आपण यकृताचे महत्त्व जाणून घ्यावे आणि स्वतःकडे दुर्लक्ष न करता काळजी घ्यावी, यासाठी ही माहिती पोस्ट करण्यात आली आहे.
LFT चे सामान्य प्रकार आणि त्यांचे उपयोग
LFT यकृतासंबंधित विविध एन्झाइम्स, प्रथिने आणि इतर पदार्थांचे मोजमाप करतात. रोगांनुसार मळमळ, भूक न लागणे, रक्तस्त्राव, खाज सुटणे, ओटीपोटात सूज येणे, त्वचा पिवळी पडणे, थकवा येणे, इत्यादी लक्षणांवरआधारित विविध प्रकारच्या यकृत चाचण्या आहेत. ज्यांमुळे यकृताचे विकार अगदी प्रारंभिक अवस्थेत असताना शोधणे आणि त्यांवर प्रभावीपणे उपचार करण्यास मदत होते. सामान्यतः केल्या जाणाऱ्या चाचण्या पुढीलप्रमाणे:
१. Alanine transaminase (ALT) – हे एक एन्झाइम आहे जे प्रथिनांचे उर्जेत रूपांतर करते. तसेच यकृत खराब झाल्यास रक्तातील एएलटीची पातळी वाढते.
२. Aspartate aminotransferase (AST) – हे अमीनो ऍसिडचे पचन करते. याच्या वाढलेल्या पातळीमुळे सिरोसिससारखे यकृत रोग होतात.
३. Alkaline phosphatase (ALP) – पित्त नलिकांमध्ये अडथळा किंवा हाडांचे आजार दर्शवू शकते.
४. Albumin and total protein – रक्तातील एकूण प्रथिनांचे प्रमाण मोजते.
५. Bilirubin – हा एक असा पदार्थ आहे, जो RBCच्या (पांढऱ्या पेशी) विघटनावेळी तयार होतो. ही चाचणी कावीळ, यकृत किंवा पित्ताशयातील अडथळे, हिपॅटायटीस, अशक्तपणाचे मूल्यांकन, यांसारख्या आजारांमध्ये उपयुक्त ठरते.
६. Gamma-glutamyl transferase (GGT) – हे एक रक्तातील एन्झाइम आहे. या एन्झाइमची उच्च पातळी यकृत किंवा पित्त नलिकांचे नुकसान दर्शवते.
७. Prothrombin time (PT) – PT म्हणजे रक्त गोठण्यास लागणारा वेळ. उच्च पातळीमुळे रक्त गोठण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो.
८. Lactate dehydrogenase (LD) – थकवा आणि स्नायू पेटके ही याच्या असामान्य पातळीची लक्षणे आहेत.
यकृत कार्य चाचण्यांची किंमत
चाचणीची किंमत ३५० ते १००० रुपयांपर्यंत असते. शहरांनुसार किंमती बदलत असतात. तसेच शासकीय रुग्णालये खासगी रुग्णालयांपेक्षा कमी शुल्क आकारू शकतात. परंतु चाचणीची किंमत कितीही असली तरी यकृतासंबंधित आजारांवर होणारे उपचार अत्यंत खर्चिक असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याकडे वैद्यकीय विमा असणे फायदेशीर ठरेल. वैद्यकीय विम्याद्वारे आपण कॅशलेस हॉस्पिटलायझेशन, नियमित हॉस्पिटल कॅश पेआऊट, कर लाभ इत्यादींचा लाभ घेऊ शकता.
यकृत कार्य चाचण्यांसाठी प्रक्रिया
ही प्रक्रिया म्हणजे एक साधी रक्त चाचणी असते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून रुग्णांच्या शरीरातून एका स्वच्छ, नवीन सुईने चाचणीसाठी रक्त काढले जाते. जे एका काचेच्या कुपीमध्ये साठवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाते. या चाचणीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, परंतु शक्यतो चाचणी प्रतिष्ठित, स्वच्छ अशा प्रयोगशाळेत करणे हिताचे ठरेल. तसेच त्याठिकाणी आपले रक्त काढण्यासाठी नवीन सुई वापरली जातेय की नाही, याची खात्रीही करून घ्यावी. त्याचबरोबर चाचणीपूर्वी अस्वस्थ वाटत असल्यास त्याबाबत त्वरित तज्ज्ञांना कळवावे.
यकृत कार्य चाचणी कधी करावी?
• मळमळ किंवा उलट्या (Nauseating)
• सतत सुस्ती
• कावीळ, ज्यामध्ये त्वचा आणि डोळे पिवळे होणे समाविष्ट आहे. (Jaundice)
• फिकट त्वचा (Pale skin)
• भूक न लागणे (Loss of appetite)
• गडद लघवी (Dark colored urine)
• हलक्या रंगाचे मल (Light colored stool)
• सहज जखम होणे (Easily bruised)
• घोटे किंवा पाय सुजतात (Ankle or leg pain and swelling)
• ओटीपोटात दुखणे किंवा सूज येणे (Abdominal pain and swelling)
• त्वचेवर खाज येणे (Itching)
जर आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही एलएफटी करून घेणे आवश्यक आहे.
काही अशा टिप्स आहेत ज्या यकृत निरोगी ठेवण्यास आणि रोगाचे लवकर निदान करण्यात मदत करतील:
१. कोणत्याही चाचण्यांसाठी डॉक्टरांची परवानगी घेणे आणि चाचणीपूर्वी तुमच्या सर्व शंका विचारणे केव्हाही चांगले. आपला कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय इतिहास असल्यास तो डॉक्टरांना सांगणे आवश्यक आहे. त्यानुसार डॉक्टर आपल्याला योग्य सल्ला देतील.
२. आजकाल कोणताही विमा आवश्यक असतो. तो तुमचा कर, तुमची बचत, अनावश्यक ताण वाचवेल. खरंतर वैद्यकीय विमा ही अशी गोष्ट आहे ज्याकडे प्रत्येकजण दुर्लक्ष करत असतो. कारण लोक असे गृहीत धरतात की, ते निरोगी आहेत परंतु बहुतेकवेळा परिस्थिती याउलट असते.
३. दारू आणि धूम्रपानाला नाही म्हणा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत: कधीही औषधे घेऊ नका. त्याचबरोबर अक्रोड, बीट, अवाकॅडो, इत्यादी जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहार यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते. महत्त्वाचे म्हणजे नियमित व्यायाम करा आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा.
आशा आहे की, ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरेल आणि आपण निरोगी राहाल.