मुतखडा लक्षणे व उपाय: संपूर्ण माहिती

Medically Reviewed By
Dr Divya Rohra
Written By admin
on Feb 3, 2024
Last Edit Made By admin
on Jan 7, 2025

कॅल्शियम आणि इतर रसायनांमुळे किडनी मध्ये तयार झालेल्या दगडांसारखे खडे म्हणजे किडनी स्टोन. ते बहुतेक कॅल्शियम ऑक्सलेटचे बनलेले असतात. लघवीमध्ये खूप वेस्ट असतो. जेव्हा तुमच्या लघवीमध्ये खनिजे आणि क्षारांचे प्रमाण जास्त असते किंवा शरीaरात पाणी कमी असते तेंव्हा विरघळलेला कचरा क्रिस्टलाईन होऊ लागतो. त्यामुळे या हार्ड वस्तू मूत्रपिंडात तयार होतात ज्यांना किडनी स्टोन म्हणतात. म्हणूनच दररोज 3-4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे, विशेषत: किडनीच्या रूग्णांसाठी हे शिफारसीय आहे जे त्यांना शरीरातील सर्व रसायने आणि कचरा विरघळण्यास मदत करते आणि ते मूत्रमार्गे जाते.
किडनी स्टोन का वेदनादायक असतात.
जेव्हा स्टोन तयार होतात, आकाराने लहान असतात आणि फक्त किडनी मध्ये असतात तेव्हा ते वेदनादायक नसतात. परंतु जेव्हा ते हालचाल करू लागतात तेव्हा ते वेदनादायक असतात. ते युरिनरी ट्रॅक्ट द्वारे युरेटर कडे जातात. लहान दगड दुखावल्याशिवाय सहज निघून जातील पण मोठ्या दगडांना ट्रॅक्टमधून जाण्यास त्रास होतो ते युरेटरमध्ये अडकू शकतात आणि युरिन अवरोधित करू शकतात.
चार मुख्य प्रकारचे किडनी स्टोन.
- कॅल्शियम ऑक्सलेट: किडनी स्टोनचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कॅल्शियम स्टोन जे सामान्यतः कॅल्शियम ऑक्सलेटच्या स्वरूपात असतो. ऑक्सलेट लिव्हर द्वारे तयार केलं जातं, काही फळे, भाज्या, नट, चॉकलेट मधून देखील शोषले जाते. व्हिटॅमिन डी चे जास्त सेवन, आतड्यांसंबंधी बायपास सर्जरी आणि अनेक चयापचय विकार युरिन मध्ये कॅल्शियम किंवा ऑक्सलेटचे प्रमाण वाढवू शकतात.
- स्ट्रुवाइट स्टोन: हा किडनी स्टोनचा कमी सामान्य प्रकार आहे. जेव्हा तुम्हाला यूटीआय किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाला असेल तेव्हा ते होतात. स्ट्रुवाइट स्टोन वेगाने वाढतात आणि आकाराने मोठे असतात.
- यूरिक ऍसिड स्टोन: तीव्र अतिसार किंवा मॅलऍब्झॉरप्शन मुळे जास्त फ्लूइड गमावलेल्या लोकांमध्ये, उच्च प्रोटीन युक्त आहार घेणारे आणि मधुमेह किंवा चयापचय सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये यूरिक ऍसिडचे स्टोन सामान्य आहेत. काही जेनेटिक घटकांमुळे युरिक ऍसिड स्टोनचा धोका वाढू शकतो. ऑर्गन मीट आणि शेलफिश यांसारख्या पदार्थांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात प्युरीन घेतल्याने मोनोसोडियम युरेटचे उच्च उत्पादन होते, ज्यामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होऊ शकतात.
- सिस्टिन स्टोन: हे सिस्टिन्युरिया नावाच्या जेनेटिक विकाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये होते ज्यामुळे किडनी विशिष्ट अमीनो ऍसिडचे जास्त प्रमाणात उत्सर्जन करते.
किडनी स्टोनची लक्षणे.
जोपर्यंत किडनी स्टोन किडनीमध्ये फिरत नाही किंवा युरेटर मध्ये जात नाही तोपर्यंत लक्षणे उद्भवत नाहीत. स्टोन्समुळे यूरिनला अडथळा निर्माण होऊन युरीनरी ट्रॅक्टवर दाब पडतो, किडनी फुगते आणि युरेटरला झटका येतो.
लक्षणे आहेत –
- बाजूला, पाठीला आणि रिब्सच्या खाली तीव्र आणि तीक्ष्ण वेदना.
- उलट्या.
- खालच्या ओटीपोटात आणि मांडीचा सांधा दुखणे.
- लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे.
- वारंवार युरिन येणे.
- गुलाबी, लाल किंवा तपकिरी युरिन.
- ढगाळ किंवा दुर्गंधीयुक्त यूरिन.
- इन्फेक्शन मुळे ताप आणि सर्दी.
- स्टोन ट्रॅक्ट मध्ये फिरत असताना त्या ठिकाणी वेदना होतात.
किडनी स्टोनची कारणे.
- पाण्याची कमतरता: शरीरात पुरेसे पाणी असणे महत्वाचे आहे जेणेकरून खनिजे व्यवस्थित विरघळतील आणि कचरा काढून टाकण्यासाठी पुरेसे लघवी तयार होईल. जर पाण्याची कमतरता असेल तर खनिजे क्रिस्टल सारखे बनू लागतात. स्टोन मध्ये बदलू शकणारे पदार्थ पातळ करण्यासाठी पाणी महत्वाचे आहे.
- फॅमिली हिस्टरी: तुमच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना किडनीची समस्या असल्यास किडनी स्टोन होणे शक्य आहे. जर तुम्हाला आधी किडनी स्टोन झाला असेल तर उपचारानंतरही तुम्हाला ते पुन्हा होऊ शकतो.
- सोडियम: मीठ आपल्या किडनीला अधिक कॅल्शियम फिल्टर करते. यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते.
- साखर: जास्त साखर देखील किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढवू शकते. जास्त साखरेचा आहार टाळावा.
- लठ्ठपणा: जर तुमचा बीएमआय ३० च्या वर असेल तर तुम्ही फक्त किडनीच्या समस्यांनाच नाही तर इतर आरोग्य समस्यांनाही आमंत्रण देत आहात. अनेक आजार आणि आरोग्य समस्यांमागे लठ्ठपणा हे एक प्रमुख कारण आहे.
- आतड्यांसंबंधी समस्या: क्रोहन रोग आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या दाहक आंत्र रोग असलेल्या लोकांमध्ये किडनीची समस्या खूप सामान्य आहे. जर तुम्हाला आतड्याची समस्या असेल तर तुमचे शरीर जास्त पाणी शोषून घेते ज्यामुळे तुम्हाला युरीन कमी होते.
- टाइप 2 डायबिटीस:.हे तुमची युरीन अधिक एसिडीक बनवू शकते, जे स्टोन्स वाढू शकते.
- संधिरोग / गौट: किडनी आणि सांध्यामध्ये यूरिक ऍसिडचे क्रिस्टल्स तयार होतात. रक्तात यूरिक ऍसिड जास्त होते.
- हायपरपॅराथायरॉईडीझम: पॅराथायरॉइड हार्मोन्सच्या वाढीव पातळीमुळे तुमच्या रक्तात आणि युरीन मध्ये कॅल्शियमची पातळी वाढते.
- रेनल ट्यूबलर ऍसिडोसिस: या मूत्रपिंडाच्या समस्येमुळे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात ऍसिड तयार होते.
- मेटाबॉलिक सिंड्रोम: हे रक्तातील फॅटचे उच्च स्तर, हाई ब्लड प्रेशर, लठ्ठपणाचे कॉम्बिनेशन आहे जे हृदयविकाराचा झटका, किडनीच्या समस्या यासारख्या अनेक परिस्थितींसाठी जबाबदार आहे.
- औषधे: काही एंटीबायोटिक्स आणि औषधे अशी आहेत जी कॅल्शियम आणि यूरिक ऍसिडची पातळी वाढवू शकतात.
डॉक्टरांना कधी भेटायचे.
जर तुम्हाला वेदनादायक लघवी, किडनीच्या ठिकाणी वेदना, गुलाबी आणि अतिशय दुर्गंधीयुक्त लघवी, युरीन करताना त्रास, ओटीपोटात आणि मूत्रपिंडात वेदना झाल्यामुळे नीट बसता किंवा उभे राहता येत नाही, अशी लक्षणे असतील तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे जेणेकरून समस्या लवकर ओळखली जाऊ शकते आणि वेळेत उपचार केले जाऊ शकतात. डॉक्टर काही चाचण्यांचा सल्ला देतील जसे की –
किडनी स्टोनवर उपचार.
उपचार स्टोनच्या आकार, स्थान आणि स्टोनचा प्रकार यावर अवलंबून अअसतो किडनी स्टोनचा उपचार मुलांमध्ये आणि अडल्ट्स मध्ये जवळजवळ सारखाच असतो.
- डॉक्टर भरपूर पाणी पिण्याची शिफारस करतात जे सर्जरी शिवाय किडनी स्टोन काढून टाकण्यास मदत करतात. डॉक्टर काही औषधे लिहून देतील ज्यामुळे तुमचे युरीन कमी एसिडीक होईल.
- जर स्टोन खूप मोठा असेल किंवा युरेटर मध्ये लघवीला अडथळा येत असेल किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर सर्जरी करण्याची शिफारस केली जाते.
- लिथोट्रिप्सी- उच्च- एनर्जी असलेल्या ध्वनी लहरींचा वापर करून शॉक-वेव्हचा वापर स्टोनचे तुकड्यांमध्ये स्फोट करण्यासाठी केला जातो जे लघवीमध्ये सहजपणे बाहेर जाऊ शकतात.
- युटेरोस्कॉपी- युटेरोस्कॉपी मध्ये, एन्डोस्कोप नावाची नळी युरेटर द्वारे घातली जाते जे एकतर आकाराने लहान असलेले स्टोन काढून टाकते किंवा आकाराने मोठे असल्यास स्टोन तोडतात.
किडनी स्टोन कसे टाळावे.
- भरपूर पाणी प्या. 2-3 लीटर पाणी रोज प्यावे. घाम आणि युरीनच्या रूपात शरीरातून अनेक विषारी पदार्थ काढून टाकले जातात.
- जास्त मीठ, साखर आणि एनिमल प्रोटीन टाळा.
- नेहमी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या.
- लठ्ठपणा टाळण्यासाठी आणि शरीराची कार्ये सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करा.