Creatinine Meaning in Marathi: शरीरातील महत्व आणि प्राथमिक विचार

Medically Reviewed By
Dr Divya Rohra
Written By Komal Daryani
on Aug 18, 2023
Last Edit Made By Komal Daryani
on Jan 9, 2025

क्रिएटिनिन हे एक कचरा उत्पादन आहे जे स्नायूं मध्ये निर्माण होते जेव्हा स्नायू दैनंदिन कामांमध्ये क्रिएटिन द्वारे प्रदान केलेली ऊर्जा वापरतात. क्रिएटिन हे अमिनो एसिड आहे जो संपूर्ण शरीरातील पेशींना, विशेषत: स्नायू पेशींना ऊर्जा पुरवण्यास मदत करतो. हे मानवी रक्ताच्या एकूण प्रमाणाच्या 1 टक्के आहे. हे रक्ताद्वारे शरीराच्या सर्व अवयवांमध्ये पोहोचवले जाते विशेषतः ज्यांना उच्च ऊर्जेची मागणी असते, जसे की स्नायू आणि मेंदू. त्याचप्रमाणे क्रिएटिनिन रक्तामध्ये सोडले जाते आणि नंतर मूत्रपिंडांद्वारे फिल्टर केले जाते. स्वच्छ रक्त शरीरात परत जाते आणि क्रिएटिनिन मूत्राबरोबर उत्सर्जित होते.
क्रिएटिनिन चाचणी म्हणजे काय?
ही चाचणी रक्त आणि मूत्रातील क्रिएटिनिन पातळी मोजते. रक्तातील क्रिएटिनिनच्या पातळीतील कोणते हि बदल मूत्रपिंडांशी संबंधित असतात कारण मूत्रपिंड आपल्या रक्तातील क्रिएटिनिन फिल्टर करते आणि मूत्रमार्गे शरीराबाहेर पाठवते. लघवीतील क्रिएटिनिन कमी असणे हे मूत्रपिंडाच्या समस्या दर्शवू शकते. जर रक्त आणि लघवीतील क्रिएटिनिनचे प्रमाण सामान्य नसेल तर ते मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण असू शकतात.
सामान्य परिणाम
पुरुषांसाठी: 0.7 ते 1.3 mg/dL (61.9 ते 114.9 μmol/L)
महिलांसाठी: 0.6 ते 1.1 mg/dL (53 ते 97.2 μmol/L)
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कमी स्नायूंचे प्रमाण असते म्हणून स्त्रियांमध्ये क्रिएटिनिनची लेव्हल कमी असते.
असामान्य क्रिएटिनिन पातळीची लक्षणे
- थकवा.
- डोळ्याभोवती सूज येणे.
- पाय आणि घोट्याला सूज येणे.
- भूक कमी होणे.
- वारंवार आणि वेदनादायक लघवी.
- फेसयुक्त किंवा रक्तरंजित मूत्र.
- टाइप 1 किंवा टाइप 2 मधुमेह.
- उच्च रक्तदाब.
- मूत्रपिंडाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास.
रक्तात उच्च / यूरीनमध्ये कमी क्रिएटिनिन पातळीची कारणे काय आहेत?
- किडनी रोग: जर तुम्ही किडनीच्या आजाराने ग्रस्त असाल तर याचा अर्थ मूत्रपिंडाचे कार्य बिघडले आहे आणि किडनीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे रक्त गाळणे आणि मूत्र विल्हेवाट लावणे प्रभावित होते. आता लघवीच्या प्रवाहावर परिणाम झाला म्हणजे क्रिएटिनिन शरीरातून बाहेर फेकले जात नाही.
- यूरीनरी ट्रॅक ब्लॉक असणे: किडनी स्टोन, ट्यूमर, वाढलेले प्रोस्टेट, मूत्रमार्ग ब्लॉक करू शकते म्हणून किडनीत लघवी जमा होते ज्यामुळे हायड्रोनेफ्रोसिस नावाची स्थिती निर्माण होते. परिणामी लघवीतील क्रिएटिनिनची पातळी कमी होते.
- जास्त प्रमाणात कठोर व्यायाम करणे: चांगली बॉडी राखण्यासाठी बहुतेक लोक जास्त वर्कआउट करतात जे उच्च क्रिएटिनिन पातळीचे एक सामान्य कारण आहे.
- अति प्रोटीन आणि मांसयुक्त आहार: कधी-कधी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटीन खाणे जसे की मांस, अंडी, दूध, डाळी यामुळे स्नायू अधिक क्रिएटिन तयार करतात त्यामुळे नंतर रक्तामध्ये क्रिएटिनिनची पातळी वाढते. पूरक आहार सुद्धा क्रिएटिनिन पातळी वाढवू शकतात.
- निर्जलीकरण (dehydration)- शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे युरिन अधिक स्फटिक (crystalline or concentrated) बनते आणि फिल्टर करणे कठीण होते. त्यामुळे कमी क्रिएटिनिन शरीरातून बाहेर टाकले जाते. किडनी स्टोन वडण्याचे मुख्य कारण हे पण आहेत.
- विशिष्ट औषधे- जर तुम्ही काही आजारांसाठी दीर्घकाळ औषधे घेत असाल, तर यामुळे तुमची क्रिएटिनिन पातळी देखील वाढू शकते. त्यामुळे तुमची क्रिएटिनिन पातळी तपासत राहणे महत्त्वाचे आहे.
- मद्यपान: अल्कोहोलचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. अल्कोहोल पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी करते ज्यामुळे स्नायूंच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि स्नायूंची रीकवरी कमी होते अत्याधिक अल्कोहोलमुळे उच्च रक्तदाब होतो आणि आपल्या मूत्रपिंडाच्या प्रणालीवर देखील परिणाम होतो.
डॉक्टर क्रिएटिनिन चाचणी का सुचवतात
- तुम्हाला किडनीच्या आजाराची लक्षणे आहेत का हे तपासण्यासाठी.
- जर तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका वाढवणाऱ्या इतर परिस्थिती असतील.
- किडनी रोग उपचार निरीक्षण करण्यासाठी.
- औषधांच्या दुष्परिणामांचे निरीक्षण करणे ज्यामध्ये मूत्रपिंडाचे नुकसान किंवा बदललेले मूत्रपिंड कार्य समाविष्ट असू शकते.
- किडनी ट्रान्सप्लांटच्या कार्याचे निरीक्षण करणे.
क्रिएटिनिन चाचणी दरम्यान काय होते?
क्रिएटिनिनची रक्त किंवा मूत्रात चाचणी केली जाऊ शकते.
- क्रिएटिनिन रक्त तपासणीसाठी:
एक लॅब अटेंडंट लहान सुई वापरून तुमच्या हातातील रक्तवाहिनीतून रक्ताचा नमुना घेईल. थोड्या प्रमाणात रक्त एका ट्यूबमध्ये गोळा केले जाईल.
- क्रिएटिनिन मूत्र चाचणीसाठी:
एक लॅब अटेंडंट तुम्हाला २४ तासांच्या कालावधीत सर्व मूत्र गोळा करण्यास सांगेल. तो तुम्हाला तुमचा लघवी गोळा करण्यासाठी एक कंटेनर देईल आणि तुमचे नमुने कसे गोळा करावे आणि कसे संग्रहित करावे याबद्दल सूचना देईल.
तपासणी पूर्वी काही करावे लागेल का?
तुम्हाला तुमच्या चाचणीच्या २४ तास आधी शिजवलेले मांस न खाण्यास सांगितले जाऊ शकते. एका शोधमध्ये असे दिसून आले आहे की शिजवलेले मांस तात्पुरते क्रिएटिनिन पातळी वाढवू शकते.
परिणामांचा अर्थ काय?
रक्तातील क्रिएटिनिनची उच्च पातळी असणे किंवा मूत्रातील कमी पातळी असणे हे किडनीचा आजार दर्शवते किंवा किडनीशी संबंधित समस्या दर्शवते.
- अवरोधित मूत्रमार्ग
- मूत्रपिंडाच्या समस्या, जसे की किडनी खराब होणे किंवा निकामी होणे, संसर्ग होणे किंवा रक्त प्रवाह कमी होणे.
- शरीरातील द्रव कमी होणे (dehydration)
- स्नायूंच्या समस्या.
- ऑटोइम्मुन रोग.
- मूत्रपिंडाचा बॅक्टरियल संसर्ग.
- हृदय रोग.
- मधुमेह.
असामान्य पातळी मूत्रपिंड समस्या दर्शवत नाही. बहुतेक वेळा खाण्याच्या सवयी किंवा इतर आरोग्य घटक देखील क्रिएटिनिनच्या पातळीवर परिणाम करतातगर्भधारणा.
- तीव्र व्यायाम.
- लाल मांस जास्त असलेला आहार.
- ठराविक औषधे.
टीप: तीव्र किंवा कठोर व्यायामा ऐवजी सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम करण्याचा विचार करा.
क्रिएटिनिनच्या अनेक चाचण्या आहेत. सामान्यतः इतर चाचण्यांसह त्याची चाचणी केली जाते कारण विविध परिणाम देणारे अनेक घटक आहेत.
येथे काही चाचण्या आहेत ज्या तुम्हाला मदत करतील
क्रिएटिनिन पातळी नियंत्रित करण्यास मदत करणारे अन्न
1.तृणधान्ये
- सफेद तांदूळ
- पास्ता
- गहू उत्पादने
(तपकिरी तांदूळ (ब्राऊन राइस) आणि संपूर्ण-धान्य पदार्थ टाळा कारण त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते)
2. फळे
- सफरचंद
- पपई
- अननस
- पेरू
- बेरी
- टरबूज
- पीच
3. भाज्या
- कोबी
- फुलकोबी
- गाजर
- कांदा
- वांगं
- भिजवलेल्या हिरव्या पालेभाज्या
काय खाऊ नये
- प्रोटीनचे सेवन कमी करणे
- निर्जलीकरण टाळणे (dehydration)
- धूम्रपान मर्यादित करा
- अतिरिक्त क्रिएटिन घेऊ नका
- उच्च सोडियम पदार्थ
- उच्च पोटॅशियम पदार्थ
- उच्च फॉस्फरस पदार्थ
Leave a comment
1 Comments
sadhabananda samal
Aug 20, 2023 at 10:22 PM.
Best article for health awareness to human society.
Myhealth Team
Aug 29, 2023 at 10:26 AM.
Thanks you sadhabananda



