थकवा म्हणजे काय? (Fatigue Meaning in Marathi)
Medically Reviewed By
Dr. Geetanjali Gupta
Written By Komal Daryani
on Aug 27, 2024
Last Edit Made By Komal Daryani
on Aug 27, 2024
तुम्हाला अनेकदा तंद्री, अशक्तपणा, आणि एकंदर थकवा येतो का? तुम्हाला खात्री आहे का की हे केवळ अति थकवा किंवा झोपेच्या अभावामुळे आहे? हा सामान्य थकवा असू शकतो जो विश्रांतीने दूर होतो. परंतु कधीकधी हा थकवा परत परत येतो आणि तुमचे जीवन आणि जीवनशैली मंदावतो. ह्यालाच थकवा म्हणजेच fatigue, म्हणतात. थकवा शारीरिक आणि मानसिक दोन्ही असू शकतो आणि हे काही अंतर्निहित परिस्थिती किंवा रोगांचे लक्षण देखील असू शकते. अशा स्थितीत तुमच्यात ऊर्जा कमी असते, प्रेरणा शून्य असते. हे अधिक सतत राहू शकते आणि तुमच्या दैनंदिन कार्यप्रदर्शनावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकते.
थकव्याची लक्षणे:
थोडी विश्रांती किंवा झोप घेतल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटले तर ठीक आहे. परंतु ही लक्षणे वारंवार येत असतील तर तुमच्या शारीरिक, मानसिक, आणि भावनिक आरोग्याला गांभीर्याने घ्या.
शारीरिक लक्षणे:
- ऊर्जेचा अभाव.
- स्नायू कमजोरी.
- हळूवार रिफ्लेक्स आणि रेस्पॉन्स.
- शारीरिक कार्यक्षमता कमी होणे.
- तंद्री येणे.
मानसिक लक्षणे:
- स्मरणशक्तीच्या समस्या.
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण.
- संज्ञानात्मक कार्यक्षमता (cognitive performance ) कमी होणे.
- चिडचिड होणे.
- दडपण किंवा तणाव जाणवणे.
- इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यात अडचण.
भावनिक लक्षणे:
- प्रेरणेचा अभाव.
- मूड स्विंग्स.
- उदासीनतेची भावना.
- नैराश्य.
थकवा आणणारे रोग
अनेक रोग आणि वैद्यकीय परिस्थितीमुळे थकवा येऊ शकतो. येथे काही रोग आणि परिस्थिती आहेत जसे की,
- अशक्तपणा: लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा येतो, ज्यामुळे ऊतींना (tissues ) ऑक्सिजनची कमी होते.
- मधुमेह: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेची पातळी मुळे थकवा आणि ऊर्जेची कमतरता होऊ शकते.
- थायरॉईड विकार:
- हायपोथायरॉईडीझम: कमी सक्रिय थायरॉईड, मेटबॉलीसम कमी करते, ज्यामुळे थकवा येतो.
- हायपरथायरॉईडीझम: अतिक्रियाशील थायरॉईड शरीराच्या अति श्रमामुळे थकवा येऊ शकतो.
- हृदयरोग: हार्ट फेल्यर सारख्या परिस्थितीमुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि परिणामी थकवा येतो.
- क्रॉनिक फटीग सिंड्रोम (CFS): याला मायलजिक एन्सेफॅलोमायलाइटिस (ME) म्हणूनही ओळखले जाते, या स्थितीला तीव्र थकवा येतो. फक्त विश्रांती घेऊन त्यावर उपचार केले जाऊ शकत नाही.
- फायब्रोमायल्जिया (Fibromyalgia): हे मस्कुलोस्केलेटल (musculoskeletal) वेदना आहे, ज्यामध्ये अनेकदा थकवा, झोप, आणि मेमोरी समस्या समाविष्ट असतात.
- झोपेचे विकार: स्लीप एपनिया, निद्रानाश आणि रेस्टलेस लेग सिंड्रोम यांसारख्या स्थिती झोपेमध्ये अडचण आणतात, ज्यामुळे थकवा येतो.
- स्वयंप्रतिकार रोग (Autoimmune Diseases):
- ल्युपस: तीव्र जळजळ आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे थकवा येतो.
- मल्टिपल स्क्लेरोसिस (MS): नर्व डॅमेज आणि मसल वीकनेस झाल्यामुळे थकवा हे एक सामान्य लक्षण आहे.
- संक्रमण:
- मोनोन्यूक्लिओसिस: एपस्टाईन-बॅर (Epstein-Barr virus) विषाणूमुळे दीर्घकाळापर्यंत थकवा येतो.
- हिपॅटायटीस: हिपॅटायटीस बी आणि सी सारख्या लिवरच्या संसर्गामुळे थकवा येऊ शकतो.
- HIV/एड्स: कालांतराने त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो, त्यामुळे थकवा येतो.
- कर्करोग: कर्करोगासारखा आजार आणि केमोथेरपी आणि रेडिएशन सारख्या उपचारांमुळे थकवा येऊ शकतो.
- क्रॉनिक किडनी रोग: किडनीचे कार्य कमी झाल्या की शरीरात कचरा जमा होतो जे बाहेर पडत नाही, ज्यामुळे थकवा येऊ शकतो.
- लिवरचे आजार: सिरोसिस किंवा लिव्हर फेल्युअर सारख्या परिस्थितीमुळे लिवरचे कार्य बिघडते. शरीर डिटॉक्सिफिकेशन करू शकत नसल्याने थकवा येऊ शकतो.
- संधिवात (Rheumatoid Arthritis): दीर्घकाळ जळजळ आणि सांधेदुखीमुळे सतत थकवा येऊ शकतो.
- क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD): फुफ्फुसाचे कार्य कमी झाल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो त्यामुळे थकवा येऊ शकतो.
- Adrenal Insufficiency: अधिवृक्क ग्रंथी (adrenal glands) अपुरे हार्मोन्स तयार करतात, ज्यामुळे थकवा येतो.
- पौष्टिक कमतरता: व्हिटॅमिन डी, बी12, लोह आणि मॅग्नेशियम यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे थकवा येऊ शकतो. स्त्रियांमध्ये हे अत्यंत सामान्य आहे.
- पैन्डेमिक फटिग : कोरोना रोगाचा सामना केल्यानंतर काही लोक थकवा आल्याची तक्रार करत आहेत.
- मानसिक आरोग्य विकार:
नैराश्य: मानसिक आणि शारीरिक हालचालींमध्ये कमतरता असल्या मुळे थकवा होतो
चिंता: सतत चिंता आणि तणावामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो.
थकवा हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते, म्हणून त्यावर लक्ष ठेवणे आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.
थकव्याचा परिणाम:
थकवा हा केवळ काही आजार नाही ज्यामुळे तुमच्या शरीराच्या काही भागावर परिणाम होतो. तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या भागांवर त्याचा परिणाम होतो:
- काम आणि उत्पादकता: तुम्ही दैनंदिन कामे कुशलतेने करू शकत नाही. व्यावसायिक असो किंवा घरगुती काम असो, चुका होण्याची शक्यता असते ज्यामुळे अपघात होऊ शकतात.
- वैयक्तिक नातेसंबंध: थकवा तुमच्या नातेसंबंधांवर सहज परिणाम करू शकतो कारण तुम्ही भावनिक आणि मानसिकदृष्ट्याही थकले आहात. तुमचा मूड बदलतो आणि सहज चिडचिड होऊ शकते.
- एकूणच आरोग्य: जेव्हा या थकवाकडे दुर्लक्ष केले जाते किंवा त्याचा स्रोत बरा होत नाही तेव्हा त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. यामुळे तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते आणि रीकवरी हळू होते.
थकवा साठी चाचण्या:
तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटत असल्यास किंवा वरीलपैकी कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास तुम्ही निश्चितपणे डॉक्टरांकडे जावे. ते तुम्हाला काही एकत्रित चाचण्या किंवा वेगळ्या चाचण्या सुचवू शकतात. ते आहेत,
स्ट्रैस आणि फटिग मॅनेजमेंट:
थकवा दूर करण्यासाठी कोणताही खरा उपचार नाही. तुम्ही करू शकता सर्वोत्तम उपचार म्हणजे ते व्यवस्थापित करणे. तुमची जीवनशैली सुधारणे आणि स्वतःची काळजी घेणे देखील इतर अंतर्निहित परिस्थितींवर योग्य उपचार केल्याने नक्कीच मदत होईल.
- झोप सुधारणे: पुरेशी झोप सुनिश्चित करणे. तुम्हाला चांगली 6 तासांची अबाधित झोप मिळेल याची खात्री करा. झोपेच्या १ तास आधी मोबाईल बंद करा आणि उठल्यानंतर लगेच वापरू नका.
- आरोग्यदायी आहार: पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार घेतल्याने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मदत होते.
- नियमित व्यायाम: आउटडोर अॅक्टिविटी आणि नियमित व्यायाम तितकेच महत्वाचे आहेत कारण ते एंडोर्फिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढवतात, रक्त आणि मेंदूमध्ये ऑक्सिजनची पातळी देखील वाढवतात.
- ध्यान: ध्यान, योग किंवा खोल श्वासोच्छवासाच्या व्यायामासारख्या relaxation टेक्निकचा सराव केल्याने तणाव व्यवस्थापनात मदत होते.
- वैद्यकीय सल्लामसलत: नियमित आरोग्य तपासणी करणे महत्वाचे आहे जेणेकरुन तुम्हाला काही वैद्यकीय स्थिती आहे का हे कळेल.
- जीवनशैली समायोजन: जीवनशैलीत बदल केल्याने जीवनाचा दर्जा सुधारतो. अनावश्यक कामाचा भार कमी करा, वर्क लाइफ बॅलेन्स सुधारा आणि अल्कोहोल, सिगरेट यांसारख्या अस्वास्थ्यकर सवयी दूर करा.