898 898 8787

Triglycerides Meaning in Marathi: ट्रायग्लिसराइड्सचा अर्थ आणि महत्त्व

Cholesterol

Triglycerides Meaning in Marathi: ट्रायग्लिसराइड्सचा अर्थ आणि महत्त्व

author

Medically Reviewed By
Dr Sohini Sengupta

Written By Meenakshi
on Apr 8, 2024

Last Edit Made By Meenakshi
on Apr 8, 2024

share
Triglycerides
share

ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय?

ट्रायग्लिसराइडहे तुमच्या रक्तात आढळणारे फॅटचे (लिपिड) सर्वात सामान्य प्रकार आहेत. ते लोणी, तेल यांसारख्या आपण खात असलेल्या अन्नातून येतात. शरीराला लगेच आवश्यक नसलेल्या कॅलरी ट्रायग्लिसराइडच्या रूपात अतिरिक्त कॅलरीज म्हणून साठवल्या जातात. हे ट्रायग्लिसराइडशरीराद्वारे जेव्हा आपल्याला एनर्जी ची आवश्यकता असते तेव्हा वापरले जाते. ट्रायग्लिसराइडतुमच्या फॅट सेल्समध्ये साठवले जातात. गरज पडल्यावर हार्मोन्स ट्रायग्लिसराइड सोडतात.

जर तुमची स्टोर्ड कॅलरी किंवा फॅट आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हाय ट्रायग्लिसराइड (हायपरट्रिग्लिसरिडेमिया) असू शकतात. 

ट्राग्लिसराइड्सची सामान्य श्रेणी काय आहे?

  • नॉर्मल — 150 मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) पेक्षा कमी, किंवा 1.7 मिलीमोल्स प्रति लिटर (mmol/L) पेक्षा कमी
  • बॉर्डर लाईन — 150 ते 199 mg/dL (1.8 ते 2.2 mmol/L)
  • हाई — 200 ते 499 mg/dL (2.3 ते 5.6 mmol/L)
  • खूप हाई — 500 mg/dL किंवा त्याहून अधिक (5.7 mmol/L किंवा जास्त

ट्रायग्लिसराइडआणि कोलेस्टेरॉल मधील फरक.

ट्रायग्लिसराइडआणि कोलेस्टेरॉल हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे लिपिड आहेत. 

  • ट्रायग्लिसराइडम्हणजे आपण खातो त्या अन्नातून पेशींमध्ये साठवलेल्या, न वापरलेल्या कॅलरी असतात आणि आवश्यकतेनुसार आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात. ते हार्मोन्स द्वारे सोडले जातात.
  • कोलेस्टेरॉल हा एक फॅटी, मेणासारखा पदार्थ आहे जो आपल्या लिवर द्वारे तयार होतो. शरीर सेल्स तयार करण्यासाठी, विटामईन्स आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी कोलेस्टेरॉल चा वापर करते.

कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचा काय संबंध आहे?

चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉल बद्दल आपण सर्वांनी ऐकले आहे. HDL (हाई डेंसिटी लिपोप्रोटीन) हे "चांगले" कोलेस्ट्रॉल आहे. तर LDL (लो-डेंसिटी लिपोप्रोटीन) हे वाईट कोलेस्टेरॉल आहे. HDL तुमच्या रक्त प्रवाहातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते. ट्रायग्लिसराइडआणि HDL यांचा परस्पर संबंध आहे. म्हणजे तुमच्या ट्राइग्लिसराइड्सची संख्या जितकी जास्त असेल तितका तुमचा HDL कमी होईल. आणि तुमचे HDL जितके जास्त तितके तुमचे ट्रायग्लिसराइडकमी.

कमी ट्रायग्लिसराइडकशामुळे होऊ शकतात?

कमी ट्रायग्लिसराइडकिंवा उच्च HDL आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतु ट्रायग्लिसराईड चे प्रमाण खूप कमी असणे हे चिंताजनक असू शकते. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी पुरेशा प्रमाणात फॅट आवश्यक आहे. अत्यंत कमी ट्राइग्लिसराइड पातळी अपर्याप्त फॅटचे सेवन सुचवू शकते. 

  • खूप कमी फॅट युक्त आहार - कमी फॅट युक्त आहार वजन कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पण जर तुम्ही फॅट नाही घेतल तर ते धोकादायक ठरू शकते. लो फॅट आहार घेणारे लोक जे खूप कमी फॅट वापरतात परिणामी ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते. मेटाबॉलीसमसाठी फॅट खूप महत्वाचे आहे, म्हणून योग्य प्रमाणात हेलथी फॅट घ्या.
  • कुपोषण: जेव्हा शरीराला विशिष्ट पोषक तत्वे पुरेसे मिळत नाहीत तेव्हा कुपोषण होते. कुपोषणामुळे लिपिड सारख्या मॅक्रोन्यूट्रिएंट्ससह महत्त्वाच्या पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. वजन कमी होणे, चरबी कमी होणे आणि मसल्स कमी होणे, कोरडे आणि ठिसूळ केस, त्वचा किंवा नखे, गाल आणि डोळे, डिप्रेशन ही कुपोषणाची लक्षणे आहेत. त्यामुळे कमी ट्रायग्लायराइड्स चे कारण कमी पोषण असू शकते. संतुलित आहार आणि आवश्यक पूरक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. 
  • दीर्घकालीन उपवास: उपवास हा आरोग्य सुधारण्याचा एक मार्ग आहे. बर्याच वेळा चांगल्या आरोग्यासाठी उपवास करण्याचा सल्ला दिला जातो कारण ते रक्तातील साखर आणि लिपिड पातळी कमी करण्यास मदत करते. एका स्टडी मध्ये असे आढळून आले की ऑल्टर्नेट दिवसाच्या उपवासाने ट्रायग्लिसराइड32% कमी होतात. ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी होण्यास जास्त उपवास करणे देखील कारणीभूत ठरू शकते.
  • हायपरथायरॉईडीझम: जेव्हा थायरॉईड हॉरमोन जास्त होतात तेव्हा असे होते. तुम्ही प्रयत्न न करता वजन कमी होते. याचा अर्थ असा होतो की शरीर नेहमी वापरापेक्षा जास्त ऊर्जा वापरत असते. शरीराद्वारे ट्रायग्लिसराइडचा वापर जास्त होतो.

हाय ट्रायग्लिसराइडम्हणजे काय?

उच्च ट्रायग्लिसराइडहे शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त फॅट चे सेवन करण्याचे परिणाम आहेत. काही कालावधीनंतर ही साठलेली चरबी मुळे आर्टरीज कडक होतात किंवा आर्टरीजच्या आतल्या भिंतीला फॅट डिपॉजिट होतो. स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. अत्यंत उच्च ट्राइग्लिसराइड्समुळे पैंक्रियाटाइटिस देखील होऊ शकतो.

हाय ट्राइग्लिसराइड्सची फारशी लक्षणे नाहीत परंतु कंबरेभोवती अतिरिक्त चरबीचे साठे, लठ्ठपणा आणि मेटाबोलीक सिंड्रोम, हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड शुगर, आणि असामान्य कोलेस्टेरॉलची पातळी तुम्ही पाहू शकता.

उच्च ट्रायग्लिसराइडकशामुळे होतात?

  • जास्त वजन असणे किंवा लठ्ठपणा असणे.
  • सिगारेट.
  • काही औषधे.
  •  नियमितपणे जास्त कॅलरी खाल्ल्याने विशेषतः भरपूर साखर आणि तेल.
  • काही जेनेटिक विकार.
  • थायरॉईड रोग.
  • टाइप 2 मधुमेह.
  •  लिवर किंवा किडनीचा आजार.
  • अल्कोहोलचा जास्त वापर.

ट्रायग्लिसराइडकमी करण्याचे कोणते मार्ग आहेत?

  • नियमित व्यायाम करा. दररोज किंवा आठवड्यातून किमान 4 दिवस 30 मिनिटे फिजिकल अॅक्टिविटी करण्याचे लक्ष्य ठेवा. नियमित व्यायाम ट्रायग्लिसराइडकमी करतो आणि "चांगले" कोलेस्ट्रॉल वळण्यास मदत करतो. हे शक्य नसल्यास लिफ्ट घेण्याऐवजी पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करा.
  • साखर आणि रिफाइंड कार्बोहाइड्रेट्स टाळा. पॅक केलेले अन्न, साखर आणि पांढऱ्या पीठाने बनवलेले पदार्थ ट्रायग्लिसराइडवाढवू शकतात.
  • तुमचा BMI तपासा. कमी वजन आणि जास्त वजन या दोन्ही आरोग्यासाठी चांगल्या स्थिती नाहीत कारण ते अधिक आरोग्य समस्या आणू शकतात. कॅलरी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा.
  • हेलथी फॅट निवडा. ट्रान्स फॅट टाळा. ऑलिव्ह आणि कॅनोला तेलांसारख्या वनस्पती मध्ये हेलथी फॅट आढळते. त्यांचा आहारात समावेश करा.
  • अल्कोहोल आणि धूम्रपान ही दोन मुख्य कारणे आहेत अवयवांचे असामान्य कार्या माघे. त्यांना पूर्णपणे टाळणे चांगले. डॉक्टरांची मदत घ्या आणि त्यावर काम सुरू करा.

काही चाचण्या ज्या ट्राइग्लिसराइड पातळी जाणून घेण्यास मदत करतील-

  1. ट्राइग्लिसराइड टेस्ट 
  2. लिपीड प्रोफाइल टेस्ट 

काय खावे आणि काय खाऊ नये.

हे पदार्थ ट्रायग्लिसराइड पातळी कमी करण्यास मदत करतील:

  • संपूर्ण धान्य ब्रेड आणि तृणधान्ये.
  • ब्राऊन राइस.
  • ओट्स.
  • रंगीबेरंगी फळे आणि भाज्या (ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स, गाजर, टरबूज, बेरी)
  • नट आणि सीड्स.
  • ड्राय फ्रुट्स आणि सोयाबीन.
  • फॅटी मासे (सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन -- आठवड्यातून दोनदा)

उच्च ट्रायग्लिसराइड असलेले पदार्थ टाळावेत

  • बीफ, पोर्क.
  • कुकीज.
  • कँडी.
  • सोडा.
  • आईस्क्रीम.
  • पेस्ट्री.
  • एनर्जी ड्रिंक्स.
  • साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचे रस.
  • लोणी आणि तळलेले पदार्थ.

हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुमच्या शरीरातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण चांगले आरोग्य किंवा खराब आरोग्यामुळे आहे. तुम्ही काय खाता याचा मागोवा ठेवा आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी नियमित चाचणी घेणे आवश्यक आहे.

Leave a comment

1 Comments

  • Umesh Garudkar

    Sep 6, 2024 at 9:41 AM.

    Very good information. Thank you

    • MyHealth Team

      Sep 7, 2024 at 5:11 PM.

      We are glad you found the information helpful. If you have any more questions, feel free to ask!

Consult Now

Share MyHealth Blog