898 898 8787

पोटातील नळ फुगणे लक्षणे: कारणे आणि उपचार | अंडाकोष फुगणे निवारण - MyHealth

Stomach

पोटातील नळ फुगणे लक्षणे: कारणे आणि उपचार | अंडाकोष फुगणे निवारण

author

Medically Reviewed By
Dr. Ragiinii Sharma

Written By admin
on Feb 3, 2024

Last Edit Made By admin
on Mar 18, 2024

share
aching young female doctor wearing medical robe holding belly
share

पोटात पूर्णता किंवा घट्टपणाची भावना, याला पोट फुगणे / ब्लोटिंग म्हणतात. हे मुख्यतः गॅसमुळे होते. तुमचे उदर पसरलेले असू शकते किंवा नसू शकते.

ही एक सामान्य स्थिती आहे जी दैनंदिन जीवनात लोकांना जास्त खाणे किंवा गॅसमुळे होते. पोट फुगणे हे सामान्यपणे हलकेच अस्वस्थ असते परंतु काहीवेळा ते तीव्र वेदनादायक असू शकते. हे सहसा चालणे किंवा घरगुती उपाय केल्याने काही काळानंतर निघून जाते परंतु काही लोकांसाठी ही एक मोठी समस्या आहे जी नियमितपणे होत असते. मुख्य कारण म्हणजे पाचक समस्या काहीवेळा होर्मोनल चढउतारांमुळे देखील ब्लोटींग होऊ शकते.

जर फुगणे जास्त खाणे, पोटात खूप गॅस निर्माण करणारे अन्न खाल्ल्याने, पोट फार दुखत नसेल किंवा एक-दोन दिवसात बरे होत असेल तर ही गंभीर समस्या नाही.

माझे पोट का फुगले आहे?

  • पोटदुखी आणि फुगण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पोटात किंवा आतड्यात जास्त गॅस होणे.
  • जर तुम्ही खाल्ल्यानंतर पोट फुगले असेल, खूप लवकर खाल्ले किंवा तुम्ही सहज पचत नाही असे अन्न खाल्ले तर ही पचन समस्या असू शकते.
  • मासिक पाळी हे तात्पुरते फुगण्याचे आणखी एक सामान्य कारण आहे. 
  • कधीकधी फुगवणे इतर मेडिकल परिस्थितींमुळे होते.

फुगलेले पोट किती काळ टिकते?

पोट फुगण्याची वेळ त्यामागील कारणानुसार बदलते. तुम्ही काही खाल्ल्याने किंवा प्यायल्यामुळे किंवा हार्मोनच्या चढउतारामुळे तुम्हाला फुगल्यासारखे वाटत असल्यास, ते काही तासांपासून 1-2 दिवसांतच हलके व्हायला लागेल. तुम्हाला तुमच्या आतड्यांच्या हालचालीमध्ये समस्या असल्यास किंवा बद्धकोष्ठता जाणवत असल्यास, जोपर्यंत तुम्ही तुमचे पोट रिकामे करत नाही तोपर्यंत तुम्हाला आराम वाटणार नाही. काही औषधांमुळे बलोटिंग होऊ शकते. तुम्ही औषध घेणे थांबवल्यानंतर ते थांबेल. आणि जर ते काही मेडिकल परिस्थितींमुळे असेल तर या स्थितीच्या तीव्रतेनुसार काही आठवडे किंवा महिने लागू शकतात.

पोट फुगण्याची कारणे काय आहेत.

  1. गॅस: पोट आणि आतड्यात वायू तयार होणे हे फुगण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. गॅस हे पचनाचे उपउत्पादन म्हणजे बायप्रॉडक्ट आहे परंतु जर तुम्ही वारंवार ढेकर देत असाल किंवा खूप गॅस पास होत असेल तर ते त्रासदायक आहे. आतड्यांतील बॅक्टरिया द्वारे कार्बोहायड्रेट्सचे पचन करताना वायू तयार होतात. बर्‍याच वेळा कार्बोनेटेड पेये किंवा खाताना आणि बोलत असताना हवा आत जाते, किंवा असे अन्न खाल्ल्याने ज्यामुळे खूप वायू निर्माण होतात, हे देखील आतड्यात वायू वाढू शकतो.
  2. स्मॉल इंटेसटाईन बॅक्टेरिया ओव्हरग्रोथ (SIBO): जेव्हा लहान आतड्यात बॅक्टेरियाची संख्या वाढते तेव्हा त्याला लहान आतड्यातील बॅक्टेरियाची अतिवृद्धी/ ओव्हरग्रोथ म्हणतात. जेव्हा कोलनमधून बॅक्टेरिया लहान आतड्यात येतात तेव्हा असे होते. या अतिवृद्धीचा बेलेंस राखण्यासाठी इतर जीवाणू वाढू लागतात, या मुळे बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते आणि बलोटिंग होते. निरोगी लोकांमध्ये काही बॅक्टेरिया असतात जे अन्न पचवण्यासाठी पुरेसे असतात. परंतु IBS, अतिसार किंवा पोटाची सर्जरी केलेल्या लोकांना SIBO असू शकते.
  3. गॅस्ट्रोपॅरेसिस: अशा स्थितीत तुम्ही तुमचे पोट रिकामे करू शकत नाही. त्यामुळे पोटाची हालचाल नीट होत नाही, पोट एकाच वेळी रिकामे होत नाही किंवा तो रिकामा करण्याचा प्रेशर तुम्हाला जाणवत नाही. यामुळे फुगणे, मळमळ आणि आतड्यांमध्ये अडथळा येतो. या विकारामुळे अन्न हळूहळू आतड्यातून जाते.
  4. हार्मोन्स: तुम्हाला तुमच्या मासिक पाळीदरम्यान किंवा त्यापूर्वी पोट थोडासा फुगलेला दिसला असेल. बर्याच स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या आधी आणि पाळीदरम्यान पोट फुगण्याचा अनुभव येतो. पेरीमेनोपॉज दरम्यान हे सामान्य आहे. स्त्री हार्मोन पोट फुगण्यास जबाबदार असतात. इस्ट्रोजेनमुळे पाणी टिकून राहते. इस्ट्रोजेनमध्ये वाढ आणि प्रोजेस्टेरॉन कमी झाल्यामुळे सूज येते. मासिक पाळीपूर्वी गर्भाशयाचा आकार वाढतो ज्यामुळे पोट फुगते. 
  5. स्वादुपिंडाचा (पँक्रियाज) विकार: स्वादुपिंड पाचक एंझाइम बनवते ज्यामुळे पचन शक्य होते. जेव्हा पँक्रियाज पुरेसे पाचक एंजाइम बनवू शकत नाही तेव्हा पोट फुगायला लागते.
  6. पोटाची जळजळ (गस्ट्रिटीस) किंवा आतडेची जळजळ (एंटरिटिस): हे सहसा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे किंवा जास्त मद्यपान केल्यामुळे होते. हे पेप्टिक अल्सरशी देखील संबंधित असू शकते.
  7. मोटीलिटी विकार: जेव्हा आतड्याच्या कॉन्ट्रॅक्टशन आणि रिलॅक्सेशन साठी मदत करणाऱ्या नसा आणि स्नायू योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा असे होते. त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा पचनसंस्थेची मंद हालचाल होते.
  8. वजन वाढणे: जेव्हाही तुमचे वजन वाढण्यास सुरुवात होते ते बहुतेक पोटापासून सुरू होते. हे पोटाचे प्रमाण वाढवते ज्यामुळे पचन प्रक्रियेसाठी कमी जागा मिळते. हे देखील फुगण्याचे एक कारण आहे. वजन वाढण्याच्या काळात पाणी टिकून राहिल्यामुळे बलोटींग होते.
  9. फ्लूइड रिटेंशन: खारट पदार्थ, हार्मोन पातळीतील बदल, वजन वाढणे आणि अन्न असहिष्णुता / फूड इंटोलेरेन्स यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अन्यथा जितके द्रव असेल त्यापेक्षा जास्त द्रवपदार्थ जमा होऊ शकतात. काही स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीपूर्वी किंवा गर्भधारणेच्या सुरुवातीला पोट फुगल्याबद्दल / ब्लोटिंग बद्दल तक्रार करतात. फ्लुइड टिकून राहिल्यामुळे होणारी तीव्र सूज लिव्हर किंवा किडनी निकामी करू शकते किंवा मधुमेह होऊ शकते.

पोट फुगण्याची लक्षणे काय आहेत.

  • बद्धकोष्ठता.
  • खावेसे वाटत नाही.
  • थोडे खाल्ले तरी पोट भरलेले वाटते.
  • छातीत जळजळ.
  • मळमळ आणि उलटी.
  • ओटीपोटात वेदना आणि अस्वस्थता.
  • अतिसार.
  • वारंवार ढेकर येणे हे हायपरअॅसिडिटीचे लक्षण सुद्धा आहे.
  • खूप गॅस पास करणे.
  • वारंवार बाथरूममध्ये जावे लागते

डॉक्टरांना कधी भेटायचे.

जर ब्लोटिंग 2 दिवसांनी कमी होत नसेल, पोट खूप दुखत असेल, तुमची भूक कमी होत असेल, खूप गॅसेस, खूप बद्धकोष्ठता, उलट्या, ओटीपोटात सूज येत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जावे. जर तुमची पोटाची सर्जरी झाली असेल किंवा ब्लोटिंग होऊ शकणारे इतर आजार असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.

पोट फुगण्यापासून आराम कसं मिळेल.

  1. बडीशेप, पेपरमिंट, हळद, कॅमोमाइल आणि आले यांचा समावेश असलेले हर्बल चहा पचन आणि गॅसमध्ये मदत करू शकतात.
  2. पेपरमिंट ऑइल कॅप्सूल पोटाच्या समस्यांवर आणि आतड्यांसंबंधी स्नायूंवर खूप उपयुक्त आहे.
  3. अँटासिड्स पचनसंस्थेतील जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि वायू अधिक सहजपणे पास करण्यास मदत करतात.
  4. मॅग्नेशियमचा नैसर्गिक रेचक (laxative) असतो आणि पोटातील एसिड बेअसर करण्यास आणि आतड्यांसंबंधी स्नायूंना आराम करण्यास मदत करते.
  5. आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन राखण्यासाठी प्रोबायोटिक्स खूप उपयुक्त आहेत. ते अन्न पचण्यास आणि वायू शोषण्यास मदत करतील.
  6. नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे, विशेषत: कोर मजबूत करणारा व्यायाम करा.
  7. फायबर खा – फायबरमुळे आतडे साफ होण्यास मदत होते. यामुळे तुमचे पोट भरलेले वाटते जे जास्त खाणे टाळण्यास मदत करते तसेच जास्त पाणी पिण्यास मदत करते. फायबर तुमच्या आतड्यातील चांगल्या बॅक्टेरिया वाढवते.
  8. अधिक पाणी प्या- यामुळे संपूर्ण पचनसंस्थेची गतिशीलता वाढते ज्याद्वारे अन्न सहजतेने जाऊ शकते.
  9. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा- त्यात फायबरचे प्रमाण कमी असते आणि ते सहज पचत नाहीत ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि सूज येऊ शकते.
  10. तुम्ही काय खाता, तुमचे शरीर विशिष्ट अन्नावर कशी प्रतिक्रिया देते, काय सहज पचले जाऊ शकते आणि काय नाही याकडे लक्ष द्या.
  11. काही काळ प्रतिबंधित आहार घेण्याचा प्रयत्न करा आणि शरीरातील बदल लक्षात घ्या. कमी-FODMAP आहाराचे पालन करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये सर्व कार्बोहायड्रेट्सचा समावेश होतो ज्यामुळे सामान्यत: पाचक समस्या, सूज येणे आणि गॅस होतो.

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog