लिपिड प्रोफाइल टेस्ट द्वारे कोणते रोग सापडतात?
Medically Reviewed By
Dr. Ragiinii Sharma
Written By Komal Daryani
on Jun 29, 2023
Last Edit Made By Komal Daryani
on Mar 18, 2024
लिपिड प्रोफाइल चाचणीला कोलेस्टेरॉल तपासणी असेही म्हणतात. ही एक रक्त तपासणी आहे जी शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण शोधण्यात मदत करते. लिपिड्सची असामान्य पातळी सहसा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग जसे की कोरोनरी हृदयरोग, पेरीफिरियल आर्टरी रोग, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक असे आजार होतात. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही निश्चितपणे या पोस्टद्वारे चाचण्या आणि रोगांची माहिती मिळवली पाहिजे.
लिपिड प्रोफाइल तपासणी समजून घेणे
लिपिड हे सेंद्रिय संयुगे आहेत जे पाण्यात अघुलनशील असतात. ते ऊर्जा साठवण, सेल मेंब्रेन संरचना आणि नियामक कार्यासाठी जबाबदार आहेत. लिपिडच्या उदाहरणांमध्ये मेण, तेल, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स यांचा समावेश होतो. त्यामुळे लिपिड पॅनेल किंवा लिपिड प्रोफाइल तपासणी आम्हाला शरीरातील लिपिड्सची लेव्हल मूल्यमापन करण्यात मदत करते. एचडीएल कोलेस्टेरॉल, एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड हे तपासणीचे प्रमुख घटक आहेत.
- टोटल कोलेस्टेरॉल - हे शरीरात असलेल्या कोलेस्टेरॉलची बेरीज आहे.
- HDL कोलेस्टेरॉल- (high density lipoprotein) याला चांगले कोलेस्ट्रॉल असेही बोलले जाते कारण ते खराब कोलेस्टेरॉल लिव्हरद्वारे शरीरातून बाहेर काढन्यास मदत करतात. एचडीएलची उच्च पातळी स्ट्रोक आणि इतर हृदयरोगाची शक्यता कमी करते.
- LDL कोलेस्टेरॉल- (low density lipoprotein) याला खराब कोलेस्टेरॉल असेही बोलले जाते. यामुळे नसा कडक आणि अरुंद होतात आणि तुमच्या हृदयातील रक्तप्रवाह कमी किंवा ब्लॉक होतो. हृदय व नसासंबंधी रोग होण्याची शक्यता जास्त असते.
- ट्रायग्लिसराइड्स- ट्रायग्लिसराइड्स हे पदार्थ, विशेषत: लोणी, तेल आणि तुम्ही खात असलेल्या इतर चरबीयुक्त पदार्थांमधून येतात. न वापरलेल्या कॅलरी फॅट पेशींमध्ये ट्रायग्लिसराइड्स म्हणून साठवल्या जातात. तथापि, या लिपिडची वाढलेली पातळी आरोग्यासाठी धोकादायक असू शकते, ते रक्तवाहिन्या देखील कठोर करतात आणि रक्त प्रवाह कमी करतात
उच्च कोलेस्टेरॉलची कारणे-
- अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी
- लठ्ठपणा
- धूम्रपान
- दारू
- वय
- PCOS
- मधुमेह
- हाइपरथाइरॉयडिज़्म
- किडनी रोग
साधे उपाय करून आणि लाइफस्टाइल बदलून आपले कोलेस्ट्रॉल निश्चितपणे नियंत्रित करता येते. अशा काही टिप्स खाली दिल्या आहेत.
- नियमित व्यायाम करणे
- निरोगी खाण्याच्या सवयी ज्यात कमी मिठाचा आहार आणि फळे, फायबरयुक्त अन्न यांचा समावेश होतो.
- धूम्रपान आणि मद्यपान सोडा
- ताण नियंत्रण
- BMI नियंत्रणात ठेवा
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Cardiovascular ) रोग:
यामध्ये कोरोनरी हृदयरोग (हृदयाच्या प्रमुख रक्तवाहिन्यांमधील नुकसान किंवा रोग), peripheral artery disease (अरुंद रक्तवाहिन्यांमुळे हातपायांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो), rheumatic हृदयरोग ( जिवाणूपासून घसा खवखवणे), डीप वेन थ्रोम्बोसिस (खोल नसामध्ये रक्ताची गुठळी, सामान्यतः पाय) धमनीच्या भिंतींमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यास सुरुवात होते ज्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात. या अवस्थेला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात, जेथे हृदयाकडे रक्ताचा प्रवाह कमी होतो किंवा ब्लॉक होतो ज्यामुळे छातीत दुखू शकते आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
येथे लिपिड प्रोफाइल तपासणी शरीरातील लिपिड्सची लेव्हल ओळखून या आजारांचे निदान करण्यात मदत करू शकते.
हायपरलिपिडेमिया-
(रक्तातील लिपिड्स आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असणे). लिव्हर शरीरासाठी आवश्यक तेवढी फॅट बनवते पण आपण खाल्लेल्या अन्नासोबत अतिरिक्त कोलेस्टेरॉल मिळतो. हे अतिरिक्त कोलेस्टेरॉल अडथळे निर्माण करण्यास सुरवात करते ज्यामुळे अवयवांना अपुरा रक्तपुरवठा होतो. सामान्यतः हायपरलिपिडेमिया लक्षणे दर्शवत नाही परंतु उपचार न केल्यास हृदयाची स्थिती अस्थिर होऊ शकते. त्यामुळे शरीराच्या धडधडणाऱ्या स्थितीची वाट पाहण्याऐवजी लवकर निदान येथे मदत करू शकते. लिपिड प्रोफाइल तपासणी घेतल्यास कोलेस्टेरॉलच्या पातळीचा योग्य अंदाज मिळेल.
कौटुंबिक हायपरकोलेस्टेरोलेमिया (Familial Hypercholesterolemia)-
FH हा एक जेनेटिक विकार आहे. जेव्हा एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी खूप जास्त असते तेव्हा हा विकार होतो. हे जन्मापासून अस्तित्वात असले, तरीही मुलामध्ये मोठे होईपर्यंत दिसून येत नाही परंतू जर दोन्ही पालकांना ही स्थिती असेल तर मुलामध्ये सुरुवातीची चिन्हे दिसतात. अतिरिक्त कोलेस्टेरॉल काहीवेळा त्वचेमध्ये (सामान्यतः हात, कोपर, डोळ्यांजवळील त्वचेवर), टेंडन्स, डोळ्याच्या बुबुळावर (बुबुळाच्या भोवती पांढरी किंवा राखाडी रिंग) जमा होते.
कौटुंबिक इतिहास जाणून घेणे फार महत्वाचे आहे कारण हे रोग अनुवांशिक आहेत. जर तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर तुमच्या मुलासाठी चाचण्या घेणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत वयाच्या 9 ते 11 व्या वर्षी तपासणी घेण्याचा सल्ला दिला जातो
मेटाबॉलिक सिंड्रोम-
हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि टाइप २ डायबिटीस वाढविणारी परिस्थितींचा समूह आहे. हाई शुगर लेव्हल, उच्च रक्तदाब, कंबरेभोवती अतिरिक्त चरबी आणि असामान्य कोलेस्टेरॉलची पातळी ही काही लक्षणे आहेत. तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम नसला तरीही या लक्षणांच्या उपस्थितीत धोका जास्त असतो. अस्पष्ट दृष्टी, थकवा, जास्त साखर यासारखी काही मधुमेहाची लक्षणे दिसल्यास, अशा प्रकरणांमध्ये शक्य तितक्या लवकर चाचण्या घेण्याची शिफारस केली जाते कारण डायबिटीस, हृदयरोग आणि लठ्ठपणा हे धोकादायक संयोजन आहे.
स्वादुपिंडाचा दाह (Pancreatitis)-
जेव्हा पाचक एंजाइम गरजेपेक्षा जास्त सक्रिय होतात आणि स्वादुपिंडाच्या पेशींना त्रास देऊ लागतात तेव्हा असे होते. अवयव निकामी होतात आणि मृत्यू होतो. ओटीपोटात दुखणे, ताप, हाई पल्स रेट, मळमळ, वजन कमी होणे ही लक्षणे असू शकतात. लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे स्वादुपिंडाचा दाह होतो.
• क्रोनिक किडनी रोग जो उच्च ट्रायग्लिसराइड्स आणि कमी एचडीएल कोलेस्ट्रॉल मुळे होतो.
• मुत्र धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे त्या बंद होऊ शकतात आणि किडनीला होणारा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो.
• हे तुमच्या एन्डोक्राइन ग्रंथीवर परिणाम करते कारण कोलेस्टेरॉल हार्मोन तयार करण्यात मदत करते. हिर्मोन इंबालान्स होऊ शकते.
• कोलेस्टेरॉलचे क्रिस्टल बनतात आणि नंतर पित्ताशयात दगड निर्माण होतात (gallstones).
• स्ट्रोक, मेंदूचे नुकसान, लठ्ठपणा, जबडा दुखणे, स्मरणशक्तीवर परिणाम.
हे सर्व उच्च कोलेस्टेरॉलचे परिणाम आहेत.
कोलेस्टेरॉल वाईट नाही. ते शरीरासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते हार्मोन, व्हिटॅमिन डी, पाचक द्रव बनवते. चांगले कोलेस्टेरॉल अवयवांचे योग्य कार्य करण्यास मदत करते.निरोगी व्यक्ती दर 4 वर्षांनी लिपिड प्रोफाइल तपासणी घेणे गरजेचे आहे.