898 898 8787

लिव्हर खराब होण्याची लक्षणे: आरोग्य तज्ज्ञांकडून महत्वाच्या टिप्स

Health

लिव्हर खराब होण्याची लक्षणे: आरोग्य तज्ज्ञांकडून महत्वाच्या टिप्स

author

Medically Reviewed By
Dr. Mayanka Lodha Seth

Written By Sheena Mehta
on Oct 28, 2025

Last Edit Made By Sheena Mehta
on Oct 28, 2025

share
https://myhealth-redcliffelabs.redcliffelabs.com/media/blogcard-images/None/451f67e9-06d8-4bdc-884c-929b910aef19.webp
share

आपण दररोज चेहऱ्याची, त्वचेची, आणि फिटनेसची काळजी घेतो, पण शरीरातलं “क्लिनिंग सेंटर”  म्हणजेच लिव्हर  अनेकदा दुर्लक्षित राहतं. हेच लिव्हर जर आजारी पडलं, तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. आपल्यापैकी अनेकांचा हा गैरसमज आहे की फक्त दारू पिणाऱ्यांनाच लिव्हरची काळजी घ्यावी लागते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हीही याच भ्रमात असाल तर थांबा! वास्तविकता अशी आहे की सध्या जगात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा सर्वात सामान्य यकृत रोग बनला आहे. लिव्हर हे आपल्या शरीरातील सुमारे 500 महत्त्वाची कामं करतं  जसे की विषारी पदार्थ फिल्टर करणे, आवश्यक हार्मोन्स तयार करणे आणि रक्त गोठवण्यासाठी प्रोटीन बनवणे, इत्यादि.  अनेकांना लिव्हर खराब होतंय हे कळतच नाही जोपर्यंत लक्षणं गंभीर होत नाहीत. चला, आता पाहूया अशी कोणती लक्षणं आहेत जी आपल्याला वेळेत ओळखायला हवीत.

लिव्हर म्हणजे काय?

लिव्हर ज्याला आपण मराठीत यकृत म्हणतो हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अवयव आहे. एका निरोगी व्यक्तीमध्ये त्याचे वजन अंदाजे 1.3 kg ते 1.8 kg असते. ते पोटाच्या उजव्या बाजूला, बरगड्यांच्या खाली सुरक्षित असते. यकृताची एक खास गोष्ट म्हणजे, स्वतःहून पुन्हा वाढू शकते. जर तुमच्या लिव्हरचा २/३ भाग काढून टाकला असेल, तर तो एका आठवड्यात सामान्य आकारात पुन्हा वाढेल. सोबतच त्याला शरीराची "रासायनिक फॅक्टरी" असेही म्हणतात, कारण ते अनेक आवश्यक प्रोटीन आणि हार्मोन्स तयार करते, ज्यांची शरीराच्या इतर भागांना गरज असते.

लिव्हरचं काम काय आहे?

लिव्हर जवळजवळ 500 प्रकारची कामं करतो, खालील काही मुख्य कामे दिली आहेत-

  1. रक्त शुद्ध करते- यकृत आपल्या रक्तातील विषारी पदार्थ, औषधे आणि दारूचे अंश फिल्टर करून शरीराबाहेर काढण्यास मदत करतो.
  2. पचनात मदत- ते पित्त (बाइल) नावाचा एक पिवळसर द्रव तयार करतो. हा द्रव लहान आतड्यांना अन्न पचवण्यासाठी मदत करतो.
  3. ऊर्जा नियंत्रण- प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स यांचा शरीरात ऊर्जा आणि इतर गरजांसाठी वापर केला जातो.
  4. पोषक तत्वांचा साठा- यकृत अनेक महत्त्वाच्या गोष्टी साठवून ठेवते, जसे की ऊर्जा देणारे ग्लायकोजेन, विटामिन्स A, D, E, K, B12 आणि लोह यांसारखी खनिजे.
  5. प्रोटीन निर्मिती- रक्त गोळा होण्यासाठी आवश्यक प्रोटीन तयार करतो, जसं की फिब्रिनोजेन, प्रोट्रोम्बिन इत्यादी.
  6. चरबीचे व्यवस्थापन- शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि फॅटची पातळी नियंत्रित करते, ज्यामुळे चरबी एनर्जी मध्ये रूपांतरित होते
  7. हार्मोन संतुलन - अतिरिक्त हॉर्मोन्स जसं की इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरोन, थायरॉईड हार्मोन्स नियंत्रित करतो.

याशिवाय लिव्हर अजून बरेच महत्त्वाचे काम करतो. म्हणूनच हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे 

लिव्हर “सायलेंट” पद्धतीने काम करतं, म्हणजेच ते आजारी असतानाही अनेकदा काही लक्षणं लगेच दिसत नाहीत. जेव्हा ती दिसायला लागतात, तेव्हा बहुतेक वेळा बरंच नुकसान झालेलं असतं. ही लक्षणं कधी कधी इतर साध्या गोष्टींसारखी वाटू शकतात जसं थकवा, स्ट्रेस, आदि.

सुरुवातीची लक्षणे-

  • सततचा थकवा आणि अशक्तपणा- तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटते, पुरेशी झोप घेऊनही ऊर्जा मिळत नाही. साध्या कामांसाठीही उत्साह नसतो.
  • पोटात अस्वस्थता आणि दुखणे- पोटाच्या उजव्या बाजूला (बरगड्यांच्या खाली) हलके दुखणे किंवा जडपणा जाणवतो. कधीकधी हात लावल्यास सूज किंवा कोमलता जाणवते.
  • पचन समस्या- भूक कमी होणे, सतत मळमळ होणे, आणि कधीकधी उलट्या होणे.
  • त्वचेवर स्पायडर वेन्स- पोटाच्या वरच्या भागात (कंबरेच्या वर) आणि छातीवर लहान, लालसर, जाळ्यासारख्या दिसणाऱ्या नसा  दिसू लागतात.

 गंभीर लक्षणे

    • रक्तस्राव- नाकातून किंवा हिरड्यांमधून वारंवार रक्त येणे, किंवा किरकोळ जखमेतून रक्त लवकर न थांबणे.
    • कावीळ- यकृत लाल रक्तपेशींमधील बिलीरुबिन साफ करू शकत नाही. त्यामुळे पिवळा रंग रक्तात जमा होतो, त्वचा, डोळे आणि नखे पिवळी दिसू लागतात.
    • झोपेची समस्या आणि मानसिक बदल- रात्री झोप न लागणे आणि दिवसा जास्त झोप येणे, तसेच विसरभोळेपणा किंवा गोंधळल्यासारखे वाटणे.
  • मळमळ, उलटी होणं
  • भूक कमी होणं
  • लघवी गडद आणि शौचाचा रंग फिकट होणं
  • पोट, पाय किंवा टाचांमध्ये सूज येणं
  • शरीरावर खाज येणं

लिव्हरशी संबंधित आजार आणि  त्यांची लक्षणे 

लिव्हरवर परिणाम करणारे अनेक आजार असतात. काही तात्पुरते असतात तर काही दीर्घकाळ टिकणारे. त्यांची लक्षणं अनेकदा सारखी दिसतात, त्यामुळे योग्य निदानासाठी तपासण्या आवश्यक असतात.

  1. फॅटी लिव्हर- यकृतामध्ये सामान्यपेक्षा जास्त चरबी जमा होते.

लक्षणं-

  • थकवा, मळमळ
  • पोटात जडपणा
  • उजव्या बाजूला दुखणं
  • भूक कमी होणं
  1. हेपेटायटिस A, B, C, D, E- व्हायरल इन्फेक्शनमुळे लिव्हरमध्ये सूज येते.
    हेपेटायटिस A आणि E प्रामुख्याने दूषित अन्न-पाणीमुळे होतात, तर B आणि C हे रक्त किंवा लैंगिक संपर्कातून पसरणारे आहेत.

लक्षणं-

  • ताप, अशक्तपणा
  • भूक मंदावणे
  • उलटी, पिवळेपणा
  • लघवी गडद, शौच फिकट
  • उजव्या बाजूला वेदना
  1. फायब्रोसिस- जेव्हा लिव्हरमधील पेशी वारंवार सूज येऊन मरतात, तेव्हा त्या जागी स्कार टिशू तयार होतं. यालाच फायब्रोसिस म्हणतात. सुरुवातीला लक्षणे नसतात, परंतु आजार वाढल्यावर ओटीपोटात दुखणे किंवा सूज येणे शक्य आहे.
  2. सिरोसिस- ही लिव्हर डॅमेजची शेवटची स्टेज आहे. लिव्हरचं टिश्यू जास्त प्रमाणात जखमी होतात, म्हणजेच फायब्रोसिस वाढत जातो आणि हळूहळू लिव्हर स्वतःला पुन्हा निर्माण करू शकत नाही, त्याला सिरोसिस म्हणतात. सिरोसिसची मुख्य लक्षणं-
  • कावीळ (पिवळेपणा)
  • जलोदर
  • हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी- गोंधळ, बोलण्यात अडखळणे, स्मरणशक्ती कमी होणे.
  • ईसोफेजियल व्हॅरिसेस- अन्ननलिकेतल्या शिरा फुगून त्यातून रक्तस्राव होणे.

लिव्हरची तपासणी

जेव्हा डॉक्टरांना तुमच्यात लिव्हर खराब होण्याची लक्षणं दिसतात, तेव्हा ते काही तपासण्या सुचवतात. सुरुवातीच्या आणि सर्वसामान्य तपासण्या ज्या लिव्हरचं आरोग्य समजून घेण्यासाठी खूप उपयोगी ठरतात-

लिव्हरचं नुकसान टाळण्यासाठी काय करावं

लिव्हर मजबूत ठेवण्यासाठी दैनंदिन सवयी आणि आहारातले छोटे बदल मोठा फरक आणू शकतात-

  • संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
  • ट्रान्स फॅट्स आणि रिफाइन्ड ऑइल्स कमी वापरा.
  • अतिरिक्त दारू लिव्हरच्या पेशींना हानी पोहोचवते आणि सिरोसिसचा धोका वाढवते. दारू पूर्णपणे बंद करा.
  • हेपेटायटिस A आणि B साठी लस उपलब्ध आहे. वेळेवर लस घेऊन स्वतःचं संरक्षण करा.
  • स्वच्छ पाणी प्या आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या.
  • नियमित व्यायाम करा.
  • अति वजनामुळे आणि स्ट्रेसमुळे लिव्हरवर ताण येतो. 
  • ध्यान, पुरेशी झोप, आणि मानसिक शांतता हे लिव्हरच्या आरोग्यासाठी तितकेच आवश्यक आहेत.

लिव्हर हा शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे पण त्याकडे आपण बहुतांश वेळा दुर्लक्ष करतो. लिव्हरचं नुकसान बराच काळ लक्षात येत नाही, कारण ते सुरुवातीला कोणतीही ठोस लक्षणं दाखवत नाही. म्हणूनच दर २ वर्षांनी एकदा लिव्हरची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराच्या एकूण आरोग्याविषयी स्पष्ट कल्पना मिळते. नियमित व्यायाम, संतुलित आहार, आणि दारू व जंक फूडपासून दूर राहणं या गोष्टी संपूर्ण शरीराचं आरोग्य टिकवून ठेवतात. हे किमान तुम्ही तुमच्या शरीरासाठी करू शकता.

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog