898 898 8787

झटपट वजन कमी करण्याचे सोपे उपाय: रोजच्या व्यायामासाठी आणि फायदे

Health

झटपट वजन कमी करण्याचे सोपे उपाय: रोजच्या व्यायामासाठी आणि फायदे

author

Medically Reviewed By
Dr. Mayanka Lodha Seth

Written By Komal Daryani
on Oct 28, 2025

Last Edit Made By Komal Daryani
on Oct 28, 2025

share
https://myhealth-redcliffelabs.redcliffelabs.com/media/blogcard-images/None/6b783cd4-28bc-4301-a24d-7293431b7e30.webp
share

आपल्या कपाटात काही कपडे असतात जे आता फिट होत नाहीत. तरीसुद्धा आपण ते ठेवून देतो, कारण मनात आशा असते की "कधीतरी वजन कमी झालं की हे परत घालीन." पण खरी गोष्ट अशी असते की वजन कमी करणं म्हणजे फक्त इच्छा नव्हे, तर प्रयत्नांची गोष्ट आहे. आणि एकदा ते प्रयत्न थांबले की वजन परत येतं. जर तुम्हालाही मेहनत करायला आळस येतो, पण तरी झटपट वजन कमी करायचं आहे — तर या सोप्या आणि झटपट टिप्स नक्की वापरून बघा. या सवयी चालू ठेवल्या, तर फक्त वजनच नाही तर तुमचं BMI देखील योग्य राहील. चला तर मग, सुरुवात करूया, नव्या आकाराच्या, नव्या आत्मविश्वासाच्या प्रवासाची!

वेट लॉसचे योग्य मार्ग: आहार, जीवनशैली आणि मानसिकता

वजन कमी करणे म्हणजे फक्त कमी खाणे आणि जास्त व्यायाम करणे नाही, तर ते संपूर्ण व्यवस्थापन आहे.हे आपण तीन भागांमध्ये समजून घेऊया. खालील सोप्या टिप्स तुम्हाला वजन कमी करण्यासोबतच ते टिकवून ठेवण्यास मदत करतील.

भाग 1- खाण्याच्या सवयी

  • साखर आणि रिफाईन्ड पदार्थ पूर्णपणे बंद करा

रिफाईन्ड साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे कॅलरी कमी करण्याची पहिली पायरी आहे. सोडा, कोल्ड ड्रिंक्स आणि गोड ज्यूसमध्ये खूप साखर असते, ज्यामुळे कॅलरी वाढतात आणि भूकही लवकर लागते. सुरुवातीला कमी किंवा साखर नसलेले चहा/कॉफी, पाणी किंवा लिंबू पाणी निवडा. PCOS/PCOD मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वजन वाढते, म्हणून हे पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

  • प्रत्येक जेवणात प्रोटीन घ्या

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे प्रोटीन खाणे महत्त्वाचे आहे. प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि अति खाणं कमी होतं. शरीराला प्रोटीन पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, म्हणजेच तुम्ही जास्त कॅलरी बर्न करता. पनीर, दही, अंडी, डाळी, शेंगदाणे, कोंबडी, मासे इत्यादी प्रोटीनचे चांगले सोर्स आहेत.

  • फायबर असलेले अन्न खा

सगळ्यांना फळांचा रस आरोग्यदायी वाटतो, पण फायबर काढल्या नंतर त्यात फक्त साखर उरते. फायबर पोट जास्त वेळ भरलेले ठेवते आणि पचन सुधारते. भाज्या, सॅलड, फळं (कमी गोड), ओट्स आणि संपूर्ण धान्य फायबरचे उत्तम स्रोत आहेत. गॅस किंवा पोटाचे त्रास (Bloating/IBS) असल्यास, फायबर हळूहळू वाढवा.

  • योग्य प्रमाणात पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे जेव्हा तुम्हाला खाण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा लगेच पाणी प्या. यामुळे तुमची भूक शांत होते, अनावश्यक कॅलरी पोटात जात नाहीत आणि जास्त खाणे टळते. जेवणाच्या 30 मिनिटं आधी पाणी घेतल्याने भूक कमी होते. रोज २-३ लिटर पाणी पिणे हे सामान्य असले तरी, पाण्याची गरज प्रत्येकासाठी सारखी नसते; ती तुमच्या शारीरिक हालचाली आणि हवामानावर अवलंबून असते. हृदय किंवा किडनीचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • लो-कार्ब डायट

कार्ब म्हणजे शरीरासाठी मुख्य ऊर्जा स्रोत. पण रिफाईन्ड कार्ब्स जसे की पांढरी ब्रेड, साखर, पांढरा भात, बेकरी पदार्थ — हे इन्सुलिन वाढवून फॅट साचवतात. जेव्हा तुम्ही चांगले कार्ब्स निवडता (संपूर्ण धान्य, भाज्या, फळे) आणि त्यांचे प्रमाण कमी करता, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी चरबी वापरण्यास सुरुवात करते. जर तुम्हाला थायरॉईड, PCOS किंवा डायबिटीज असेल, तर कमी कार्ब्सचा आहार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

  • लहान प्लेट वापरा

लहान प्लेट वापरणे हा एक माईंड गेम आहे. लहान प्लेट वापरल्यास तुम्ही अन्नाचे कमी प्रमाण घेता, ज्यामुळे कमी खाल्ले जाते. प्लेटमध्ये जास्त हेल्दी पदार्थ भरण्याचा प्रयत्न करा.

  • घरात हेल्दी अन्न साठवा

घरात जर पिझ्झा, केक असेल, तर तो संपेपर्यंत आपण खातोच. त्याऐवजी फळं, सुकामेवा, ओट्स, अंडी, ग्रीन टी अशा हेल्दी गोष्टी ठेवा. भूक लागल्यावर लगेच चांगला पर्याय मिळेल.

  • हळू खा

जेवण घाई न करता, शांतपणे आणि चांगले चघळून खा. यामुळे पोट भरले हा संदेश तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचायला वेळ मिळतो आणि आपोआप कमी खाल्ले जाते.

भाग 2- जीवनशैलीत बदल

  • रोज शारीरिक हालचाल करा

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल आवश्यक आहे. दररोज किमान १५ मिनिटे चाला किंवा जॉगिंग करा. साध्या व्यायामाने सुरुवात करून हळूहळू स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ वाढवा. लक्षात ठेवा जास्त घाम म्हणजे जास्त कॅलरी बर्न, हा गैरसमज आहे. कॅलरी बर्न होणे हे व्यायामाच्या तीव्रतेवर आणि वेळेवर अवलंबून असते.

  • ताण नियंत्रणात ठेवा

तणाव हे जास्त खाणं, पचन बिघडणं आणि वजन वाढण्याचं एक मोठं कारण आहे. तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करा, चांगली पुस्तकं वाचा, कॉमेडी चित्रपट पाहा किंवा निसर्गात थोडा वेळ घालवा. वर्क-लाईफ बॅलन्स राखा, कारण तो बिघडल्यास तुम्ही नकळत बीपी, शुगर आणि हायपरटेंशनसारख्या आजारांना निमंत्रण देता.

  • चांगली झोप घ्या

भूक ही फक्त रिकाम्या पोटाने नाही, तर न्यूरोट्रान्समीटर द्वारे नियंत्रित होते. घ्रेलिन भूक वाढवतो, तर लेप्टिन पोट भरल्याची जाणीव देतो. झोप कमी झाल्यास, भूक वाढवणारा हार्मोन (घ्रेलिन) वाढतो आणि पोट भरल्याची जाणीव देणारा हार्मोन (लेप्टिन) कमी होतो. यामुळे तुम्हाला जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि वजन वाढते. 7 तासांची गाढ झोप घेतल्यास शरीर लवकर बरे होते आणि तुमचे हार्मोन संतुलित राहतात.

  • फास्टिंगचा योग्य वापर करा

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठराविक वेळ खाणं. यामुळे शरीरातल्या इन्सुलिन लेव्हल कमी होतात आणि फॅट बर्निंग वाढतं. जसं की,

  • 16:8 पद्धत- 16 तास उपवास आणि 8 तासांच्या विंडोमध्ये खाणं.
  • 5:2 पद्धत - आठवड्यातील 5 दिवस नेहमीप्रमाणे खा आणि 2 दिवस थोड्या कमी कॅलरीचा आहार (सुमारे 500-600 कॅलरी).
  • Eat-Stop-Eat पद्धत - आठवड्यातून एकदा किंवा दोनदा 24 तास उपवास
  • बसणे कमी करा

जास्त वेळ बसून राहू नका. प्रत्येक तासाला उठा आणि कमीत कमी २ मिनिटे चालून या. यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म चांगले राहते.

भाग 3- मानसिकता आणि दृष्टिकोन

  • स्वतःला कामात गुंतवा

बहुतेक वेळा आपण काहीच काम करत नसताना भूक लागल्यासारखं वाटतं किंवा खाण्याची इच्छा होते. जेव्हा तुम्हाला या प्रकाराची भूकेची लहर येते, तेव्हा लक्ष दुसरीकडे वळवा. लगेच काही खाण्याऐवजी थोडं चालून या, पाणी प्या, संगीत ऐका किंवा काही हलकंफुलकं काम करा. असं केल्याने अनावश्यक खाणं टळतं आणि कॅलरीचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

  • विचारांना योग्य दिशा द्या

फक्त वजन काट्यावर लक्ष केंद्रित करू नका. जर तुम्हाला रिजल्ट तुमच्या आवडीनुसार नाही मिळाला तर निराश होऊ नका. चांगल्या बदल (Non-scale victories) सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जर हे बदल तुम्हाला जाणवत असतील, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.

  • तुम्हाला हलके आणि उत्साही वाटू लागले आहे.
  • तुमची झोप चांगली आणि गाढ झाली आहे.
  • तुमचे पचन सुधारले आहे.
  • तुम्हाला थकवा जाणवत नाही आणि आनंद वाटतो.

वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढण्यामागचं कारण समजण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या सुचवू शकतात, जसं की —

काही लोक पहिल्याच दिवसापासून वजन आणि कॅलरी मोजायला लागतात — हे नक्कीच चांगलं आहे, पण त्याचं व्यसन करू नका. अधूनमधून तपासणी करणे योग्य आहे, पण त्याचा ताण घेऊ नका. वजन कमी करण्यासाठी सतत उपवास करणे किंवा कोणतेही क्रॅश डायट घेणे शरीरासाठी घातक ठरू शकतं. सोशल मीडियावर दिसणाऱ्या सल्ल्यांपेक्षा नेहमी प्रमाणित डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्या. ते तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य आहार आणि व्यायाम सांगतील. लाइफस्टाईलमध्ये थोडेचांगले बदल केल्यावर तुम्ही केवळ वजनावरच नाही, तर अनेक आजारांवरही नियंत्रण मिळवू शकता. 

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog