898 898 8787

१० कारणे! पूर्ण शरीर तपासणी का करावी? - MyHealth

Health

१० कारणे! पूर्ण शरीर तपासणी का करावी?

author

Medically Reviewed By
Dr Divya Rohra

Written By Komal Daryani
on Jun 2, 2023

Last Edit Made By Komal Daryani
on Jan 11, 2025

share
https://myhealth-redcliffelabs.redcliffelabs.com/media/blogcard-images/3434/e60f890f-f30c-4f5a-8a0e-a049a10908ee.jpg
share

‘संपूर्ण आरोग्य तपासणी' म्हणजे आपले सर्व अवयव योग्यरित्या कार्यरत आहेत का, याची वैद्यकीय चाचण्यांद्वारे खात्री करून घेणे. शरीरात कोणतीही समस्या असल्यास तिचे वेळेत निदान आणि तिच्यावर वेळेत उपचार व्हावे, यासाठी ही तपासणी आवश्यक असते.

उदाहरणार्थ, तिसऱ्या-चौथ्या टप्प्यातील कर्करोगाच्या तुलनेत पहिल्या-दुसऱ्या टप्प्यातील कर्करोगावर उपचार करता येतात. आरोग्यविषयक कोणत्याही चाचणीचे निकाल आल्यानंतर त्यानुसार आपल्याला दैनंदिन जीवनशैलीत बदल करता येतात. यासाठीच नियमित आरोग्य तपासणी गरजेची असते.

१. वेळेत रोगनिदान: 

रोगनिदान म्हणजे रोग शोधण्याची प्रक्रिया आणि त्यावरून काढलेले अनुमान. अचूक रोगनिदान ही योग्य उपचारांसाठीची पहिली पायरी असते. रोगनिदान झाल्यानंतर पूरक उपचार करणे शक्य होते.

उदाहरणार्थ, कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात झाले आणि वेळेत उपचार केले, तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. तसेच वंध्यत्वाच्या समस्येचे वेळेत निदान झाल्यास त्यावर उपचार करून ती दूर करता येऊ शकते. तर, शस्त्रक्रिया हा अपेंडिसायटिसवरील उपचार असला तरी त्याचेही वेळेत निदान होणे आवश्यक असते. अनेकदा अपेंडिक्सची लक्षणे दिसत असूनही जास्त त्रास जाणवत नसल्यामुळे रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्षामुळे अपेंडिक्सला छीद्र पडण्याचा धोका संभवतो.

२. प्रतिबंधात्मक उपाय:

संपूर्ण शरीर तपासणी एखाद्या व्याधीचे मूळ शोधून काढते. त्यामुळे तिचा प्रसार रोखता येतो. उदाहरणार्थ, रक्त चाचण्यांमध्ये साखरेचे प्रमाण वाढलेले आढळले, तर साखरमुक्त आहार घेणे, हे योग्य ठरते.

डॉक्टरांना चाचणीद्वारे एखादा आजार ओळखता आला की, त्यांना त्यावर उपचार करणे सोपे होते. याशिवाय, एखादा आजार त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात नियंत्रित केल्यास शरीरात त्याद्वारे होणारी गुंतागुंत टाळता येते. 

३. संतुलित जीवनशैली अंगीकारणे:

सुखी आयुष्यासाठी मन आणि शरीर सुदृढ ठेवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आरोग्याची काळजी घेणे, ही आपण स्वतःसाठी अंगिकारलेली एक चांगली सवय असते. 

संपूर्ण शरीर तपासणी आपल्याला आरोग्याविषयी जागरुक करते आणि काही ठराविक कृतींची जबाबदारी घेण्यास सक्षम बनवते. यामुळे आपसूकच आपली निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल सुरू होते.

४. मनःशांती:

दैनंदिन व्यवहारातील ताण-तणाव हलका करण्यास आपण सक्षम असणे, आपल्या आयुष्यात आपण समाधानी असणे, येईल ती परिस्थिती योग्यरीत्या हाताळणे, स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटणे, आनंदासाठी इतरांवर अवलंबून नसणे, आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन असणे ही सुदृढ मानसिक आरोग्याची लक्षणे आहेत.

शरीराच्या स्वास्थ्यासह मनाचे स्वास्थ्य जपणे आवश्यक असते. संपूर्ण शरीर तपासणीमुळे शारीरिक व्याधींसह आपल्या अनेक मानसिक व्याधी दूर होण्यासही मदत होते.

५. जीवनशैली सुधारणे:  

आपले जीवन हे अत्यंत अनमोल असून ते जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आपण आपल्या जगण्याची गुणवत्ता अर्थात दर्जा उंचावणे गरजेचे आहे. त्यापैकीच नियमित वैद्यकीय तपासणी करून स्वतःला सुदृढ ठेवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे.

आजची तरुणमंडळी साधारणतः तिशीत विवाहबद्ध होत असल्याने त्यांची मुलं मोठी होईपर्यंत त्यांचा वृद्धापकाळ जवळ आलेला असतो. त्यामुळे वृद्धापकाळ जवळ येत असतानादेखील आपण संतुलित आयुष्य जगू याची काळजी तरुण पिढीने आजच घ्यायला हवी. त्यासाठीच जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे.

६. बचत: 

कोरोनाकाळात आपण पहिलेच असेल, रुग्णसंख्या वाढत असताना शासकीय रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नव्हते, तर खासगी रुग्णालयांमधील उपचार प्रचंड खर्चिक होते. खरंतर कोरोनाची लक्षणे सौम्य असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार होत होते. मात्र शरीरात अति संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ उद्भवत होती. याचाच अर्थ कोणताही आजार हा सुरुवातीच्या टप्प्यात असताना त्यावर सहज, सुटसुटीत उपचार करता येतात. जे तुलनेने कमी खर्चिक असतात. त्यामुळे वेळच्या वेळी केली जाणारी आरोग्य तपासणी ही कमी खर्चिक आणि बचत वाढविणारी ठरते.

७. नातेसंबंध सुधारणे:

आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी पडू नये. यासाठी आपण आपल्या प्रियजनांची विशेष काळजी घेत असतो. त्यातून नातेसंबंध आणखी घट्ट होतात.

अनेक भागांमध्ये विवाहापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते. समाजात याबाबत दुमत असले, तरी याद्वारे अनुवंशिक रोगांपासून पुढील पिढीचे संरक्षण होऊ शकते. 

८. कार्यक्षमतेत सुधार: 

मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्तीशी संबंधित कार्यांमधून मेंदूचे आरोग्य किती सुदृढ आहे हे कळते. मेंदूचे आरोग्य संतुलित असल्यास आपल्या कार्यपद्धतीस चालना मिळते. उदाहरणार्थ, शाळेत जाणाऱ्या तंदुरुस्त विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांबाबतही रुची असते.

९. निरोगी वयोवाढ: 

आपल्या निरोगी वाढीवर अनेक घटकांचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ अनुवंशिकता, जी आपल्या नियंत्रणात नसते. तर व्यायाम, निरोगी आहार, आरोग्याची काळजी, इत्यादी बाबी आपल्या नियंत्रणात असतात.

वाढत्या वयानुसार जीवनाची गुणवत्ता राखण्यासाठी आपल्या शरीरात, मनात काय घडतेय हे आपल्याला अचूक माहिती असणे, त्यावर योग्य उपाय करणे आवश्यक असते. म्हणूनच नियमित आरोग्य तपासणीद्वारे आपण आपली निरोगी वयोवाढ अनुभवू शकतो. 

१०. स्वत:ची काळजी घेण्यास वचनबद्धता: 

एक स्व-काळजी वचनबद्धता आपला ताण व्यवस्थापित करण्यास, आपल्याला चिरतरुण ठेवण्यास मदत करते. नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे, पूर्ण झोप घेणे, सर्वांसोबत हसून-खेळून राहणे, जीवनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन असणे, ही संतुलित आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

"साधारणतः तिशीच्या पुढील व्यक्तींना आजारांचा धोका अधिक असतो. त्यामुळे तपासणीद्वारे शरीरातील विविध अवयवांच्या आरोग्याचे मूल्यांकन करून भविष्यातील धोका कमी करण्यास मदत होते. तसेच आरोग्याची काळजी घेणे म्हणजेच सक्रिय राहणे, निरोगी अन्न निवडणे, पुरेशी झोप घेणे, मद्यपान, ध्रुम्रपान टाळणे, इत्यादी लहान बदलांमुळे आपण भविष्यात निरोगी वृद्धत्व जगू शकतो."

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog