898 898 8787

तोंडाचा कॅन्सर लक्षणे - वेळेवर ओळखा आणि उपचार करा

Cancer

तोंडाचा कॅन्सर लक्षणे - वेळेवर ओळखा आणि उपचार करा

author

Medically Reviewed By
Dr. Mayanka Lodha Seth

Written By Sheena Mehta
on Jul 10, 2025

Last Edit Made By Sheena Mehta
on Jul 31, 2025

share
https://myhealth-redcliffelabs.redcliffelabs.com/media/blogcard-images/None/f3cf424e-0741-441d-9a8b-973e2067b476.webp
share

कॅन्सर – हा शब्द ऐकताच पूर्वी भीती वाटायची. पण आता ही भीती झपाट्याने वास्तवात बदलतेय. आज जवळजवळ प्रत्येक नवव्या भारतीयाला कॅन्सरचा धोका आहे, असं हेल्थ रिपोर्ट सांगतात. अनेक मोहल्ल्यांमध्ये, प्रत्येक दुसऱ्या गल्लीत कुणीतरी कॅन्सरशी झुंज देतंय. यामागे तंबाखू, दारू, चुकीचा डायेट आणि वाढतं पॉल्युशन ही मोठी कारणं आहेत. नॅशनल ओरल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे ६०,००० तोंडाच्या कॅन्सरचे नवे रुग्ण आढळतात. हे फक्त शरीरावर परिणाम करत नाही, तर देशाच्या इकॉनॉमीवरही मोठा इम्पॅक्ट टाकतं. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या एका रिसेंट स्टडीनुसार, तोंडाच्या कॅन्सरमुळे भारताला दरवर्षी सुमारे ५.६ बिलियन डॉलर्सचं आर्थिक नुकसान होतं. यामध्ये ट्रीटमेंटचा खर्च, वर्क लॉस, आणि अकाली मृत्यू यांचा समावेश आहे.

तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय?

तोंडात किंवा ओठांवर असामान्य पेशी वेगाने वाढू लागतात, त्याला तोंडाचा कर्करोग (कॅन्सर) म्हणतात. बहुतेकदा ही जीभ, हिरडा, ओठ किंवा गालाच्या आतल्या भागात छोट्या जखमांनी किंवा गांठीने सुरू होते. तोंडाला ओरल कैविटी म्हणतात त्याप्रमाणे कॅन्सरला ओरल कॅन्सर म्हणतात. जेव्हा तोंडातील पेशी अनियमितपणे वाढू लागतात आणि शरीर त्यांना थांबवू शकत नाही तेव्हा असे होते. सुरुवातीला ही वाढ लहान गाठीसारखी दिसू शकते, परंतु ती वाढतच राहते. सुरुवातीला ते साधे छाले (उलसर) वाटतात, पण ते बर होत नाही.

तोंडाचा कॅन्सर लक्षणे 

तोंडाच्या कर्करोगामागील सामान्य कारणे अशी आहेत-

  • तंबाखूचं सेवन

धूम्रपान (सिगारेट, बिडी, सिगार), धूम्रपानरहित तंबाखू (गुटखा, पान मसाला, खर्रा), आणि दारूचे सेवन हे तोंडाच्या पेशींवर वाईट परिणाम करतात व एकत्र सेवन केल्यास कॅन्सरचा धोका दुप्पट होतो.

  • एचपीव्ही व्हायरस (Human Papillomavirus)

एचपीव्ही (HPV) हा एक लैंगिक संसर्गाने पसरणारा व्हायरस आहे. हा व्हायरस विशेषतः घशाच्या मागील भागात (ओरोफॅरिंक्स) कॅन्सर होण्याचे एक प्रमुख कारण बनत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही या व्हायरसमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

  • तोंडाची अस्वच्छता

तोंडी आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास आणि दातांची अस्वच्छता राहिल्यास, तोंडाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. दातांच्या कवळीची फिटिंग व्यवस्थित नसेल, दात खडबडीत असतील ज्यामुळे तोंडात जखमा होत असतील, तर हे सर्व कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकते.

  • कमी अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स

तुमच्या आहारात फळे आणि भाज्या कमी प्रमाणात असतील, तर त्यामुळे तोंडाच्या ऊती (tissues) कमकुवत होऊ शकतात. यामुळे तोंडाला संसर्ग होण्याची शक्यता वाढते, जे पुढे जाऊन कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते.

  • सूर्यप्रकाश

आपले ओठ आपल्या त्वचेपेक्षा जास्त संवेदनशील असतात. ओठांचे संरक्षण न करता जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास ओठांचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना ओठांना एसपीएफ (SPF) असलेले लिप बाम लावणे महत्त्वाचे आहे.

  • अज्ञात कारणे

जवळपास ५-१०% तोंडाच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये, नेमके कारण अज्ञात राहते. अशा परिस्थितीत, कॅन्सर होण्यामागे अनुवांशिक बदल, काही अज्ञात पर्यावरणीय विषारी घटक किंवा रोगप्रतिकारक शक्तीच्या समस्या असू शकतात.

तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं

आपल्याला माहीत आहे की, कॅन्सर हा आजार हळूहळू स्टेजनुसार वाढत जातो. अनेकदा सुरुवातीची लक्षणे लोक दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की, "हा तर साधा अल्सर आहे" किंवा "काही दिवसात बरे होईल" – पण अशाच चुकांमुळे आजार पुढच्या स्टेजला पोहोचतो. म्हणूनच चला, तोंडाच्या कॅन्सरची स्टेजनुसार लक्षणे समजून घेऊ, जेणेकरून आपण वेळेत सावध होऊ आणि उपचार सुरू करू शकू.

  • प्रि-कॅन्सर आणि पहिल्या स्टेजमधली लक्षणं

  • कधी कधी आरशात आणि टॉर्चच्या उजेडात आपले तोंड नीट पाहिल्यास अनेक गोष्टी लवकर लक्षात येऊ शकतात – जसे की पांढरे डाग (Leukoplakia), लालसर डाग (Erythroplakia), दोन्ही रंगांचा मिश्र भाग (Erythroleukoplakia), जीभ, गाल किंवा हिरड्यांमध्ये रंग व टेक्स्चरमध्ये बदल. 
  • दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ न भरलेले अल्सर किंवा जखम, तसेच गालाच्या आतील भागात जाणवणारा जाडपणा.
  • स्टेज II आणि III

कॅन्सर जसजसा वाढत जातो, तसतसा तो डोके आणि मानेतील नसांवर परिणाम करू लागतो. यामुळे जबडा, ओठ, जीभ किंवा तोंडाभोवती सुन्नपणा (numbness) येणे किंवा संवेदना कमी होणे हे एका गंभीर समस्येचे स्पष्ट लक्षण आहे.

  • कॅन्सरमुळे तोंड, जबडा, जीभ किंवा ओठ सुन्न होऊ शकतात; टच केल्यावर काही जाणवत नाही, किंवा नर्व्सवर दबाव आल्याने हलकंसुद्धा लागलं तरी त्रास होतो. 
  • तोंड उघडणं, बंद करणं किंवा जेवण चावणं कठीण होऊ शकतं.
  • लाळ बनवणाऱ्या ग्रंथी फुगणे.
  • गळ्यात गाठ येणं.
  • तोंडात कायम वेदना असणं.
  • शब्द नीट उच्चारता येत नाहीत, आवाज बदललेला वाटतो.
  • डेंचर नीट बसत नाहीत किंवा दुखायला लागतात.
  • स्टेज IV – एडवांस्ड स्टेज

या स्टेजमध्ये कॅन्सर फक्त तोंडापुरता राहत नाही, तर हळूहळू आजूबाजूच्या भागांमध्ये आणि इतर अवयवांमध्ये पसरायला लागतो.

  • दात हलू लागणे.
  • जीभ किंवा जबड्यात सूज येणे.
  • लहान गाठी किंवा थोडे सुन्नपणा त्यांच्या मूळ स्थानाबाहेर पसरू लागतो. ते मोठ्या नसांवर परिणाम करू लागते.
  • जर लिम्फ नोड्स प्रभावित झाले, तर तुम्हाला मान किंवा जबड्यात सूज, अडथळे किंवा गाठी दिसू शकतात.
  • जर कॅन्सर जबड्यावर किंवा जबड्याच्या हाडावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायूंमध्ये पसरला, तर तुम्हाला ट्रायस्मस (Trismus) किंवा "लॉकजॉ" नावाची स्थिती येऊ शकते. यामुळे तुम्ही तुमचे तोंड पूर्णपणे उघडू शकत नाही किंवा काही प्रकरणांमध्ये, अजिबात उघडता येत नाही.
  • कदा तोंडाचा कर्करोग (Oral Cancer) मेटास्टेसिस (Metastasis) झाला, म्हणजेच तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला, की तो त्या अवयवांवर परिणाम करू लागतो जिथे तो पसरला आहे जसे की यकृत किंवा फुफ्फुसे.

इतर लक्षणं

  1. घशाच्या कॅन्सरमध्ये गिळताना वेदना, आवाजात बदल किंवा खरखर, आणि एकाच बाजूच्या कानात सतत वेदना अशी लक्षणे दिसू शकतात.
  2. वजन कमी होणं.
  3. तोंडातून रक्त येणं.

डॉक्टरांकडे कधी जावे?

जर छाला किंवा जखम १५ दिवसांपेक्षा जास्त वेळेपासून बरी होत नसेल, तोंडात सतत वेदना, सूज, जळजळ होत असेल किंवा अन्न गिळताना त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, जर तुमचा आवाज बदललेला जाणवत असेल किंवा तोंडात कोणतीही गाठ दिसत असेल, तर हे गंभीर लक्षण असू शकते आणि याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे

 कोणते चाचण्या होतात?

डॉक्टर तुमची ओळख व तपासणी करून काही चाचण्या सुचवतात:

  1. MCED टेस्ट 
  2. Fine Needle Aspiration Cytology (FNAC) टेस्ट 

काय करावे आणि काय टाळावे?

कर्करोग टाळण्यासाठी किंवा त्याचा प्रसार आणि वाढ थांबवण्यासाठी काही महत्त्वाचे मार्ग आहेत-

काय टाळावे:

  • तंबाखू, सिगारेट, गुटखा, सुपारी आणि दारू.
  • सतत गरम, मसालेदार आणि जास्त गरम चहा/कॉफी. 

काय करावे:

तोंडाच्या आरोग्यासाठी नियमित दात घासा, जीभ स्वच्छ ठेवा, भरपूर पाणी प्या, अन्न चावून खा, व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा, सनस्क्रीन लावा, HPV लसीकरण करा आणि फळे-भाज्यांसह संपूर्ण धान्यांचा आहार घ्या; तसेच तोंडात फोड, जळजळ किंवा गाठी असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निष्कर्ष 

भारतात पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर हा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. तर महिलांमध्ये, तो ब्रेस्ट, सर्व्हिक्स आणि गर्भाशयाच्या कॅन्सर नंतर चौथ्या क्रमांकावर आहे. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की लवकर निदान किती महत्वाचे आहे. तोंडाची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे कारण आपण जे काही खातो ते आपल्या तोंडातून जाते. जर ते व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर जंतू सहजपणे आत जाऊ शकतात आणि जर कर्करोग नसेल तर तुम्हाला दातांच्या समस्या होऊ शकतात. चांगल्या सवयी तुम्हाला नेहमीच निरोगी राहण्यास मदत करू शकतात. तुमची जागरूकता तुमचे रक्षण करू शकते.

Leave a comment

Consult Now

Share MyHealth Blog